केंद्रीय कर्मचाऱ्यांचे निवृत्त वय ६० वर्षच राहणार

नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण आता कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय ६० वर्षेच राहणार आहे. निवृत्तीचे वय ६० वरून ५८ वर्षे करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत लेखी उत्तरामध्ये ही माहिती दिली. सध्या तरी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय ६० वरून ५८ वर्षे करण्यासाठी कुठलाही प्रस्ताव नसल्याचेही, त्यांनी सांगितले.
१ एप्रिल २०२० पासून सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वयात काही बदल करण्याचे समजले होते. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम झाला होता.
दरम्यान केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी हा संभ्रम दूर केला आहे. त्यांनी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयाबाबत लोकसभेतच लेखी उत्तरात माहिती दिली आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय ६०वर्षे असणार हे स्पष्ट झाले आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा