गोल पोस्ट राष्ट्रीय केरळ मध्ये १३ वर्षीय मुलीवर बलात्कार

केरळ मध्ये १३ वर्षीय मुलीवर बलात्कार

केरळ: गेल्या दोन दिवसांपासून देशात दोन बलात्कार प्रकरणांमुळे खळबळ उडाली आहे. काल एका पीडितेच्या जीव ही गेला आहे. आणि अश्या घटनांमध्ये आणखी एक धक्का दायक प्रकार समोर आला आहे. केरळ मध्ये १३ वर्षीय मुलीवर बलात्कार करण्यात आला आहे.
केरळमधील १३ वर्षाच्या मुलीसोबत विनयभंगाचे प्रकरण समोर आले आहे. कोट्टायममधील कांजिरापल्ली भागात एका व्यक्तीने पाणी मागण्याच्या बहाण्याने मुलीच्या घरात घुसून त्यानंतर मुलीला एकटे पाहून बलात्कार केला. शाळेतून घरी परत आल्यानंतर मुलगी एकटी होती. पोलिसांनी आरोपीविरोधात आयपीसी कलम ३७६ आणि पोक्सो कायद्याच्या कलम ३ आणि ४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ५ डिसेंबर रोजी संध्याकाळची ही घटना सांगितली जात आहे. शुक्रवारी पोलिसांना या प्रकरणात तक्रार मिळाली. शनिवारी सकाळी पोलिसांनी आरोपीला अटक केली. अटक केलेल्या आरोपीचे वय २५ वर्षे आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version