केरळमध्ये प्राध्यापकावर प्राणघातक हल्ला, NlA न्यायालयाने सहा जणांना ठरवले दोषी

केरळ, १२ जुलै २०२३ : केरळमधील विशेष एनआयए न्यायालयाने प्राध्यापकाचा हात कापल्याप्रकरणी आज सहा जणांना दोषी ठरवले. न्यायालयाने दोषी ठरवलेले सर्व आरोपी हे, बंदी घालण्यात आलेल्या कट्टरपंथी इस्लामिक संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे सदस्य आहेत. विशेष एनआयए न्यायालयाचे न्यायाधीश अनिल के भास्कर यांनी या प्रकरणाची सुनावणी घेतली.

न्यायालयाने आरोपींना भारतीय दंड संहिता अंतर्गत खुनाचा प्रयत्न, कट रचणे आणि इतर अनेक गुन्ह्यांसाठी दोषी ठरवले आहे. एका प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांच्या माध्यमातून, धर्माचा अपमान केल्याच्या समजातून आरोपींनी प्रोफेसर टी जे जोसेफ यांचा हात कापला होता. केरळमधील न्युमन कॉलेजचे प्रोफेसर जोसेफ हे त्यांच्या कुटुंबासह चर्चमधून घरी येत असताना, सात जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर हल्ला करत हात कापला होता.

या खटल्याच्या पहिल्या टप्प्यात ३१ आरोपींना सुनावणीला सामोरे जावे लागले होते. यामधील ६ जणांना दोषी ठरवण्यात आले असून, पाच आरोपींना मुक्त करण्यात आले आहे. अन्य आरोपींना स्फोटक पदार्थ कायदा आणि आयपीसी अंतर्गत दोषी ठरवले आहे. व गुन्हेगारांना आश्रय दिल्याप्रकरणी आणखी तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा