समृद्धी महामार्गावर एअर ऍम्ब्युलन्स सेवा सुरु करणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई, १२ जुलै २०२३ : समृद्धी महामार्गावर अपघातांचा सिलसिला सुरूच आहे. मंगळवारी रात्री उशिरा एका खासगी बसची ट्रेलर ट्रकला धडक बसली. या अपघातात २० प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी चार जणांची प्रकृती चिंताजनक आहे. वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

समृद्धी महामार्गावर लवकरच एअर अॅम्ब्युलन्स सेवा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासाठी राज्य सरकारने अनेक हेलिकॉप्टर कंपन्यांशी बोलणी सुरू केली आहेत. अपघात झाल्यास तत्काळ सेवा देण्यासाठी राज्य सरकार नागपूर ते मुंबई दरम्यानच्या महत्त्वाच्या खासगी रुग्णालयांशी करार करणार आहे. त्याचबरोबर एअर अॅम्ब्युलन्स आणि हॉस्पिटल सेवा देण्यासाठी संबंधित कंपन्यांसोबत लवकरच करार करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने समृद्धी महामार्गावर हेलिपॅड बांधण्याचा निर्णय घेतला आहे. समृद्धी महामार्गालगत जवळपास १६ हेलिपॅड बांधण्यात येणार आहेत. समृद्धी महामार्गावर होणारे अपघात आणि अपघातांनंतर संभाव्य आपत्कालीन परिस्थितींना तोंड देण्यासाठी हे हेलिपॅड बांधण्यात येणार आहेत. प्रस्तावित आराखड्यानुसार पहिले हेलिपॅड खर्डी ते इगतपुरी दरम्यान, महामार्गाच्या बोगद्या विभागाजवळ असणार आहे, ज्याचे सध्या बांधकाम सुरु आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा