‘केरळ स्टोरी’ वरून प्रकाश आंबेडकरांच मिश्किल वक्तव्य.

पुणे ९ मे २०२३ : केरळ स्टोरी, केरळ स्टोरी, केरळ स्टोरी. मीडिया, सोशल मीडिया, राजकारण, बॉक्स ऑफिस कलेक्शन सगळीकडे केरळ स्टोरी. काही राज्यांमध्ये टॅक्स फ्री तर काही राज्यांमध्ये या चित्रपटावर बंदी. अगदी देशाच्या पंतप्रधानांनी सुदधा अशा वादग्रस्त विषयावरच्या चित्रपटाचे समर्थन केले. पण मी ‘केरळ स्टोरी’ सारखे चित्रपट कधीच बघत नाही. असे वंचित बहुजन पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात पिंपरी चिंचवड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

पत्रकार परिषदेत पुढे बोलताना, प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधान मोदींना उद्देशून मार्मिक टिप्पणी ही केली. मोदींना टोला लगावताना ते म्हणाले की, काही जण ठरवून लग्न करतात, तर काही जण प्रेमविवाह करतात. प्रेमविवाह करताना जात धर्म बघितला जात नाही. मात्र, पंतप्रधान मोदींना प्रेमविवाहाचा अनुभव नसल्याने त्यांना लव्ह जिहादची माहिती नाही.

कर्नाटक निवडणूकीत प्रचारा दरम्यान एका सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाला पाठिंबा दिला होता. केरळ हे देशातले सुंदर राज्य आहे. केरळमधील लोक खूप परिश्रमी आणि प्रतिभावान आहेत. पण त्याच केरळमध्ये सुरू असणाऱ्या दहशदवादी कटाचा खुलासा या चित्रपटाने केला आहे. या चित्रपटाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाठिंबा दिल्यानंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रीया येत आहेत.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, असे चित्रपट मी कधीच बघत नाही. या अशा चित्रपटाच्या प्रसिध्दीसाठी राजकीय वाद निर्माण केला जात आहे. त्यासाठी हे राजकारण सुरू असून, खात्री आहे की या चित्रपटातून घेण्यासारखे काहीही नसेल असे मला वाटते अशी प्रतिक्रीया प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा