केरळमध्ये मान्सून दाखल

केरळ, दि. १ जून २०२०: केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाले आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार नैऋत्य मॉन्सून केरळमध्ये पोहोचला आहे. केरळमध्ये झालेल्या मुसळधार पावसादरम्यान, भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) राज्यातील ९ जिल्ह्यांसाठी पिवळा इशारा जारी केला आहे. केरळमधील तिरुअनंतपुरम, कोल्लम, पठाणमथिट्टा, आलाप्पुझा, कोट्टायम, एर्नाकुलम, इडुक्की, मलप्पुरम आणि कन्नूर जिल्ह्यात हवामान खात्याने पिवळा इशारा जारी केला आहे.

केरळमधील बर्‍याच भागात मुसळधार पाऊस पडत आहे, त्यामुळे तापमानात लक्षणीय घट नोंदली गेली आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार तिरुअनंतपुरममधील दिवसाचे तापमान २५ अंशांपर्यंत गेले आहे. केरळ आणि लक्षद्वीपच्या दक्षिण किनारी भागात गेल्या चार दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे.

हवामान खात्याने शनिवारी हा मान्सून पूर्व पाऊस आहे असे म्हटले होते. तर हवामान अंदाज एजन्सी स्कायमेटने असा दावा केला आहे की नैऋत्य मॉन्सून केरळच्या किनारपट्टीवर दाखल झाला आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाचे (आयएमडी) महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी रविवारी सांगितले की, मान्सून अद्याप केरळमध्ये पोहोचलेला नाही, आम्ही यावर नियमित नजर ठेवत आहोत. ५ जूनला मान्सूनचा केरळमध्ये आगमन होण्याची शक्यता आहे.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की यापूर्वी भारतीय हवामान खात्याने आपल्या अंदाजात सांगितले होते की, केरळमध्ये यंदा उशिरा मान्सून दाखल होईल. हवामान खात्याने म्हटले आहे की केरळमध्ये यंदाचा मान्सून ५ जूनपर्यंत येऊ शकेल.

सर्वप्रथम केरळमध्ये दाखल होतो मॉन्सून

भारतातील नेऋत्य मॉन्सून दरवर्षी जून ते सप्टेंबर दरम्यान ४ महिने टिकतो. साधारणत: केरळमध्ये तो प्रथम दाखल होतो. यानंतर मॉन्सून वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचतो. मागील वर्षी मान्सून त्याच्या निश्चित तारखेच्या दोन दिवस अगोदर १८ मे रोजी अंदमान आणि निकोबारमध्ये दाखल झाला होता, परंतु त्याची गती कमी झाल्यामुळे केरळमध्ये उशीरा आला होता, तर १९ जुलै रोजी संपूर्ण देशात पावसाळा सुरू झाला होता. विभागाच्या म्हणण्यानुसार यंदा मान्सून सामान्य राहील.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा