इंदापूर (प्रतिनिधी -योगेश कणसे): सध्या कोरोना मुळे संपूर्ण जगात हाहाकार मजला असल्यामुळे आपल्या देशात सध्या लॉक डाऊन करण्यात आले आहे. यामधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. यामध्ये केशकर्तनालय सुद्धा बंद असल्याने नागरिकांची चांगलीच हेळसांड होत असल्याचे चित्र दिसत आहे. सध्या सर्व नागरिकांना प्रशासनाने घरात बसण्याच्या सूचना दिल्या आहेत; परंतु लहानांपासून ते वयोवृद्धांच्या जीवनशैलीचा भाग असणारे सलून बंद असल्याने नागरिकांची पुरती धांदल उडाली असल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या इंदापूर तालुक्यात मात्र वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे.
लॉकडाउन मध्ये सलून ची दुकाने बंद असल्यामुळे नागरिक इलेक्ट्रॉनिक मशीन खरेदी करून त्या मशिनच्या साह्याने आपल्या डोक्यावरचे केस घरीच काढत आहेत. तसेच काही जण घरीच कात्रीच्या साह्याने कटनी करताना दिसत आहेत. यामध्ये लहान बालके, शालेय विद्यार्थी, नोकरदार, मध्यमवर्गीय, वयस्कर यांचाही समावेश आहे.
पुढील काही दिवस आणखीन घरातून बाहेर पडायचे नाही कार्यालयात वा कुठल्याही कार्यक्रमाला उपस्थित राहायचे नसल्याने लोक निर्धास्तपणे आपल्या डोक्यावरचे सर्व केस काढून टाकून उन्हाळा वाढू लागलेले फक्त आता या काढून टाकलेल्या उजडे चमन वरून हात फिरवताना दिसताहेत.
सध्या तालुक्यातील कोणत्याही गावात प्रवेश केला तर टक्कल केलेले लोक पाहायला मिळत आहेत. त्यामुळेच की काय साध्य कोरोना चा कहर असताना मात्र इंदापूर तालुक्यात लोकांनी केलेल्या टक्कलाची चर्चा सोशल मीडिया वरती सुरू आहे.
सध्या इंदापूर तालुक्यातील काही सलून वाले नागरिकांना त्यांच्या घरी जाऊन दाढी कटिंग ची सेवा देत असल्याचे समजत आहे, मात्र यासाठी त्यांच्याकडून दुप्पट दर आकारला जात असल्याचे देखील बोलले जात आहे. कारवाई च्या बडग्याने सलून दुकानदार दुकान उघडण्यास धजावत नाहीत. त्यामुळे नामी शक्कल लढवत दुप्पट दर आकारत नागरिकांना घरी जाऊन सेवा देत असल्याचे दिसून येत आहे.