घरकुलांना पाच ब्रास वाळू शासन निर्णयानुसार मोफत द्यावी.भास्कर भैलुमे

कर्जत, दि. ५ जून २०२०: शासन निर्णयानुसार घरकुलाना पाच ब्रास वाळू मोफत द्यावी. या मागणीसाठी भास्कर भैलुमे यांनी तहसीलदार नानासाहेब आगळे कर्जत यांना निवेदन दिले. शासनाने प्रत्येक नागरिकांना २०२० पर्यंत पक्के घर देण्याचा संकल्प केला असुन त्या माध्यमातून घरकुल बांधण्यांच्या अनेक योजना प्रस्थापित केल्या आहेत. त्या पैकी रमाई आवास योजनेला मोफत पाच ब्रास वाळू देण्याचा शासनाने निर्णय घेतला होता.

माञ कर्जत तालुक्यातील अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणा मुळे हजारो बाधंवाच्या घरकुलांचे स्वप्नं अधूरे राहीले आहे. ग्रामीण व शहरी भागातील लोकांना रमाई आवास योजने अंतर्गत घरकुल देण्याची योजना आहे. सध्या जिल्हा सह राज्यातील वाळूचा तुटवडा असल्याने शासनानेच या साठी गरिबांच्या घरकुलांना अडथळा येऊ नये म्हणून पाच ब्रासचा शासन निर्णय काठला होता. त्यातुन प्रत्येक लाभधारकाला पाच ब्रास वाळू विना रोयलटी उपलब्ध करून देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. माञ त्यांची अंमलबजावणी आतापर्यंत कर्जत तालुक्यातील झालीच नाही.

या साठी अनेक लाभर्थी आणि भास्कर भैलुमे यांनी गट विकास अधिकारी यांच्या समोर पाच ब्रास वाळू मोफत मिळण्यासाठी अंदोलन करून तहसीलदार यांच्याशी पञ व्यावहार करून देखील. प्रत्यक्षात मात्र हे काम आज प्रर्यत झालेले नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा