खासदार अमोल कोल्हेनी घेतली केंद्रीय कृषी मंत्र्यांची भेट

पुणे: पावसामुळे राज्यामधील शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना त्वरीत आर्थिक मदत करावी, तसेच पिक विम्याचा लाभ मिळवून द्यावा. यासाठी खासदार अमोल कोल्हे यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांची भेट घेऊन यांच्याकडे समस्या मांडल्या आहेत.
शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदर डॉ. अमोल कोल्हे यांनी ओला दुष्काळ तसेच पिकविम्या संदर्भात देशाचे कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांची भेट घेऊन पिकविम्यात समाविष्ट नसलेल्या फळबागा व पिके यांचा सामाविष्ट करण्यासंदर्भात निवेदन दिले.
या निवेदनात म्हटले आहे की, पिकविम्याअंतर्गत फक्त ठरावीक पिकांचा व फळबागा येत असुन हे शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक आहे. यंदाच्या वर्षी सरकारने पिकविम्यामध्ये
द्राक्ष, कांदे, डाळींबाचा सामावेश केला. परंतु हा निर्णय घेण्यासाठी खूप उशीर झालेला असून ओल्या दुष्काळी परिस्थितीमुळे सरसकट शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी. तसेच पिकविम्याचा हप्ता कमी करण्यासाठी सरकारने आपले अधिकार वापरून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असे ठोस पाऊल उचलावे. आत्ता झालेल्या अतिवृष्टीमुळे काही पिके काढण्यासाठी आली होती, तर काही पिके कापुन ठेवण्यात आली होती. पंरतु जिल्ह्यातील कृषी विभागाच्या कृषी अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे त्यांनी पंचनामे हे फक्त कागदावरच केले. प्रत्यक्षात शेतकऱ्यांचा बंधावर जाण्यास टाळले ही बाब खेदजनक आहे.यासाठी कृषी विभागासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात यावा.
पिकविम्याचा जाचक अटी या शेतकऱ्यांना विचारात न घेता तयार केल्या आहेत. तसेच पीकविमा कंपन्याचा फायद्यासाठीच या सर्व जाचक अटी आहेत. विमा कंपन्या ह्या शेतकऱ्यांना मदत न देता कंपनीच्या नफ्याकडे पाहत आहेत.
शेतकऱ्यांना शासकीय योजना, पीकविमा संदर्भात जनजागृती करण्यासाठीअभियान, शिबिरे राबविण्यात यावित शेतकऱ्यांना सहज रितीने उपलब्ध होईल अशी यंत्रणा उभारण्यात यावी असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा