खा. ओमराजे निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीयकृत बँकेची आढावा बैठक

2

लातूर, दि. ४ जुलै २०२०: लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभा मतदार संघातील निलंगा तालुक्यातील राष्ट्रीयकृत बँकेची काल दिनांक ३ जुलै रोजी आढावा बैठक घेण्यात आली. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले.

अर्थव्यवस्था शेतीवर आधारित आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था मजबूत होण्यासाठी पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट शंभर टक्के साध्य करण्याची आवश्यकता आहे. कायदा आणि व्यवहार यांची सांगड घालून पीक कर्जाचे वितरण झाले पाहिजे. पीक कर्जाची पद्धत सोपी करून शेतकऱ्यांना कमीत कमी कागदपत्रात कर्ज वाटप चालू करावे आणि टार्गेट प्रमाणे कर्ज वाटप पूर्ण करावे.

पात्र शेतकरी कर्ज पुरवठ्यापासून वंचित राहू नये. आपल्या बँकेकडून पूर्वी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांकडून फेरफार नक्कल घेऊ नये. तसेच ऊस कारखान्याचे हमी पत्र मागू नये, ऊस लागवड प्रमाणपत्र घ्यावे, अशा प्रकारच्या सूचना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी संबंधित बैठकीत दिल्या.

मुद्रा बँकेच्या माध्यमातूनही जास्तीत जास्त कर्ज वितरण करण्याची आवश्यकता असल्याचे देखील खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सांगितले. आपला जिल्हा प्रामुख्याने कृषी प्रधान आहे, छोटे उद्योग विकसित होण्यासाठी मुद्रा बँकेच्या माध्यमातून कर्ज वितरण झाले पाहिजे, यावर भर द्यावा,असे देखील ते म्हणाले.
या बैठकीत लातूर जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी, विधानसभा संघटक शेखर चव्हाण, चेअरमन दगडू सोळुंखे, अजित माने, शिवसेना तालुकाप्रमुख ईश्वर पाटील, शिवसैनिक प्रा. आण्णासाहेब मिरगाळे, सुनील नाईकवडे, प्रशांत वाजरवाडे, औसा तालुकाप्रमुख सतिश शिंदे, लातूर जिल्हा अग्रणीय बँक अधिकारी श्री बर्डे, सहाय्यक निबंधक कुलकर्णी, गटविकास अधिकारी ताकभाते, डॉ. सचिन सगर, मनोज सोमवंशी, मारूती मगर, महेश जोशी, मिनाज शेख, आणि सर्व बँक मॅनेजर आदी उपस्थित होते.

न्यूजअनकट प्रतिनिधी: प्रगती कराड.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा