गोल पोस्ट राजकारण खिसे गरम व्हायचेत अजून: यशोमती ठाकूर

खिसे गरम व्हायचेत अजून: यशोमती ठाकूर

मुंबई : आताच शपथ घेतली आहे, खिसे गरम व्हायचेत अजून’, असे वादग्रस्त विधान राज्याच्या मंत्री यशोमती ठाकूर यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे खातेवाटप नुकतेच पार पडले. महाविकास आघाडीतील महिला व बाल विकासमंत्री तथा काँग्रेस आमदार ठाकूर यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे.
राज्यात सध्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीचे वारे वाहत आहे. यासाठी एका प्रचारसभेत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन यशोमती ठाकूर यांनी केले. हे आवाहन करत असतानाच त्यांनी सदरील वादग्रस्त विधान केले आहे.

यावेळी यशोमती ठाकूर म्हणाल्या की, आताच शपथ घेतली आहे, खिसे गरम व्हायचेत अजून. आपले काही सरकार नव्हते. घरी आलेल्या लक्ष्मीला का नको म्हणायचे, पण मत पंजालाच करायचे. सध्या विरोधात आहेत त्यांचे खिसे भरलेले आहेत, ते खाली करायचे असल्यास तुम्ही घरी आलेल्या लक्ष्मीला नाकारू नका. दरम्यान, यशोमती ठाकूर यांच्या या वक्तव्यामुळे आता नवीन वाद उभा राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version