खाे-खाे एशियन चॅम्पियनशिपची दिल्लीला यजमानपद.

महाराष्ट्र: मराठमाेळ्या खाे-खाेला जागतिक स्तरावर नवीन ओळख मिळवून देण्यासाठी अखिल भारतीय महासंघाने कंबर कसली आहे. यासाठीच आयपीएलच्या धर्तीवर खाे-खाे लीगसारख्या युवांच्या गुणवत्तेला चालना देणाऱ्या स्पर्धांचे आयाेजन करण्यावर अधिक भर दिला जात आहे. यातूनच आता भारतामध्ये खाे-खाेच्या एशियन चॅम्पियनशिपचे आयाेजन करण्यात आले आहे. खाे-खाेची ही पाचव्या सत्राची चॅम्पियनशिप पुढच्या वर्षी दिल्लीमध्ये हाेणार आहे. ही स्पर्धा २८ ते ३१ जानेवारीदरम्यान दिल्लीमधील त्यागराज स्टेडियमवर पार पडणार आहे. भारतीय संघ चाैथ्यांदा या स्पर्धेच्या यजमानपदाचा बहुमान भूषवणार आहे. यापूर्वी १९९८, २०१५ आणि २०१८ मध्ये ही स्पर्धा पार पडली हाेती.

आता देश-विदेशात खाे-खाेच्या प्रसार आणि प्रचाराला वेग आला. त्यामुळे आशिया खंडात खाे-खाेने अल्पावधीत माेठी प्रगती साधली. आता याचाच प्रत्यय पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात येणार आहे.

दाेन्ही गटांत २० संघ सहभागी;३२ सामने रंगणार…

पुढच्या वर्षी हाेणाऱ्या चाैथ्या सत्राच्या एशियन खाे-खाे चॅम्पियनशिपमध्ये दहा संघ आपले कसब पणाला लवणार आहेत. यामध्ये यजमान आणि गत चॅम्पियन भारतासह पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, भूतान, श्रीलंका, मलेशिया, दक्षिण काेरिया, सिंगापूरसारख्या संघांचा समावेश आहे. या दहा देशांचे प्रत्येकी दाेन असे एकूण २० संघ दाेन्ही गटांमध्ये सहभागी हाेतील. या दाेन्ही गटातील २० संघांमध्ये एकूण सामन्यांचा थरार रंगणार आहे.

मॅटवर हाेणाऱ्या या सामन्यामध्ये ३०० खेळाडूंच्या राेमहर्षक खेळीने या स्पर्धेला चांगलीच रंगत येणार आहे. यामध्ये खास करून यजमान भारताच्या गुणवंत ३० खेळाडूंची घरच्या मैदानावरील कामगिरी लक्षवेधी ठरणारी असेल. हे दाेन्ही संघ तीन वेळचे विजेते आहेत.

पुरस्कार विजेत्यांनाही राेख रकमेसह ट्राॅफी…

आयाेजक अखिल भारतीय खाे-खाे महासंघ आणि दिल्ली संघटनेच्या वतीने या स्पर्धेचे आयाेजन करण्यात येणार आहे. यासाठी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचेही आर्थिक सहकार्य लाभणार आहे.

भारतामधील चाैथ्या एशियन खाे-खाे चॅम्पिनयशिपचे आयाेजन भव्य आणि वेगळ्या पद्धतीने करण्यासाठी महासंघाने कंबर कसली आहे. या स्पर्धेतील विजेत्या संघावर राेख बक्षिसांचा वर्षाव हाेणार आहे. यादरम्यान विजेत्या संघांना राेख बक्षिसासह ट्राॅफी देऊन गाैरवण्यात येईल. याशिवाय स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट संरक्षक आक्रमक खेळाडूंनाही पुरस्काराने गाैरवण्यात येणार असल्याचे आयाेजकांनी स्पष्ट केले. या विजेत्या खेळाडूंना राेख रकमेसह ट्राॅफी देण्यात येईल.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा