किल्ल्यांनी जपला… ऐतिहासिक वारसा

तोरणा किल्ला

“शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करत असताना पहिला मिळविलेला किल्ला म्हणजे तोरणा किल्ला. हा किल्ला घेऊनच शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधले अशी माहिती इतिहासात आहे. प्रत्यक्षात या गडावर तोरण जातीची प्रचंड झाडे होती.त्यामुळे त्या किल्ल्याचे नाव तोरणे असे पडले होते. परंतु जेव्हा प्रत्यक्षात महाराज जेव्हा गडाची पहाणी करण्यासाठी आले तेव्हा त्या गडाचा एवढा मोठा विस्तार पाहून त्या गडाचे नाव तोरणावरून “प्रचंडगड” ठेवण्यात आले.”

इ.स.१४७० ते १४८६च्या दरम्यान बहमनी राजवटीसाठी मलिक अहमद याने हा किल्ला जिंकला .पुढे हा किल्ला काही काळ निजामशाहीच्या ताब्यात होता.त्यानंतर तो शिवाजी राजांनी घेतला. शिवाजी राजे जेव्हा आग्रा मोहिमेहुन परतले. त्यानंतर राजांनी गडाचा जीर्णोद्धार केला. छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. त्यानंतर पुन्हा सचिव शंकराजी नारायण यांनी हा किल्ला पुन्हा स्वराज्यात आणला.

पुढे इ.स.१७०४ मध्ये औरंगजेबाने या किल्ल्याला वेढा घातला. व लढाई करुन हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. त्यानंतर औरंगजेबाने त्याचे नाव ‘दैवी विजय” असे ठेवले होते. परंतु पुन्हा चार वर्षांनंतर सरनोबत नागोजी कोकाटे यांनी गडावर हल्ला करून तोरणा पुन्हा स्वराज्यात आणला. यानंतर तोरणा कायमच स्वराज्याच्या ताब्यात राहिला. ज्यावेळी पुरंदरचा तह झाला त्यावेळी जे किल्ले मोगलांना दिले गेले.त्यात तोरणाचा समावेश होता.

या किल्ल्याचे आणखी विशेष म्हणजे औरंगजेबाने लढाई करून जिंकलेला तोरणा हा एकमेव किल्ला आहे.अशी नोंद आहे.

-प्रशांत श्रीमंदिलकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा