किल्ल्यांनी जपला… ऐतिहासिक वारसा

वासोटा किल्ला

“वासोटा किल्ला ज्या डोंगरावर विराजमान झालेला आहे. तेथे वशिष्ठ ऋषींचा एक शिष्य रहात होता. म्हणून त्याने या डोंगराला आपल्या गुरूंचे नाव दिले आहे. असे अभ्यासकांचे मत आहे. आणि अशी आख्यायिका देखील आहे. “वशिष्ठ” ज्याला पुढे वासोटा असे संबोधले गेले असावे अशी माहिती आहे. शिलाहारकालीन राजांनी या डोंगरावर किल्ला बांधला. वासोटा किल्ल्याची मूळ बांधणी शिलाहार वंशीय दुसऱ्या भोज राजाने केली असावी असा इतिहासात उल्लेख आढळतो.”

शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याचा वापर ‘तुरुंग’ म्हणून केला जात असे. याचे कारण म्हणजे तेथे असणारे निर्जन व घनदाट जंगल. याशिवाय किल्ल्याच्या परिसरात वाघ, बिबत्यांसारखे प्राणीही दिसत.म्हणू महाराजांनी या किल्ल्याचे नाव “व्याघ्रगड” ठेवले होते.

अफजलखानाच्या वधानंतर शिवाजी राजांच्या दोरोजी या सरदाराने राजापूर वर हल्ला करून येथिल इंग्रजांना अफजलखानाच्या गलबतांचा पत्ता विचारला होता. त्यांनी तो सांगितला म्हणून इंग्रजांच्या ग्रीफर्ड नावाच्या अधिकाऱ्याला अटक केली होती. व त्याला वासोटा किल्ल्यावर ठेवले होते.

१६६१ मध्ये पकडलेल्या इंग्रज कैद्यांपैकी रेव्हिंगस्टन, फॅरन, सॅम्युअल यांना वासोट्यावर कैद करून ठेवण्यात आले होते. पुढे १६७९ मध्ये वासोटा किल्ल्यावर २६,०००रुपये सापडले. त्यानंतरच्या काळात १७०६मध्ये ताई तेलिनीने हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. त्यानंतरच्या दुसऱ्या वर्षी पेशव्यांच्या सेनापतीने बापू गोखले यांनी ताई तेलिनीबरोबर लढाई केली. आठ-दहा महिन्यांच्या प्रखर झुंजीनंतर तेलीनी चा पराभव झाला. आणि वासोटा किल्ला पेशव्यांच्या ताब्यात आला.

त्या अगोदर शिवाजी राजांनी जावळी जिंकल्यानंतर आसपासचे अनेक किल्ले जिंकले. परंतु वासोटा जर दूर असल्याने घेतला नाही.पुढे शिवाजी महाराज पन्हाळ गडावर अडकले असताना त्यांनी आपल्या मावळ्यांना पाठवून वासोटा किल्ला आपल्या ताब्यात घेतला होता.

वासोटा किल्ला परिरात आजही घनदाट जंगल आणि झाडी आहे. त्यामुळे त्या ठिकाणी जातांना जपून जावे लागते. शिवाजी राजांच्या काळात कैद्यांना या किल्ल्यावर ठेवले जायचे. कैद्यांना तिथून पळून जाणेही अशक्य होते.म्हणून राजानी तुरुंग म्हणून हा किल्ला निवडला.

-प्रशांत श्रीमंदिलकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा