किल्ल्यांनी जपला…ऐतिहासिक वारसा – किल्ले शिवनेरी

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील जुन्नर या गावाजवळ हा किल्ला आहे. राज्यातील एक महत्वाचा किल्ला म्हणून याकडे पाहिले जाते. १९ फेब्रुवारी १९३० रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म या किल्ल्यावर झाला.

‘जीर्णनगर’ तथा ‘जुन्नरे’ म्हणजेच आताचे जुन्नर हे गाव इस पूर्व काळापासून प्रसिद्ध आहे. ही शक राजा नहपानाची राजधानी होती. त्यानंतर सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्मी याने शकांचा नाश केला. आणि जुन्नर आणि परिसरात आपले वर्चस्व प्रस्थापित केले.त्यावेळी दळण वळणाची नाणेघाट हा व्यापारी मार्ग निवडण्यात आला होता.सर्व व्यापार याच मार्गाने चालत असे. सातवाहन राजांनी या भागात अनेक ठिकाणी लेण्या खोदून ठेवल्या आहेत.ज्या आज पर्यटकांच्या आकर्षण ठरत आहेत.

११७० ते १३०८ या कालावधीमध्ये यादवांनी आपले राज्य याठिकाणी प्रस्थापित केले. यादवांच्या काळामध्येच शिवनेरी ला गडाचे स्वरुप प्राप्त झाले. इ.स.१४४३ मध्ये मलिक-उर-तुजार याने यादवांचा पराभव करुन किल्ला सर केला.त्यानंतर किल्ला बहमनी राजवटीखाली आला.१४५६ मध्ये मलिक महमदच्या वडिलांच्या मृत्यूनंतर निजामशाहीची स्थापना झाली. इ.स.१४९३ मध्ये इथली राजधानी अहमदनगर या ठिकाणी हलविण्यात आली.

इ.स.१५९५ मध्ये जुन्नर प्रांत मालोजी राजे भोसले यांच्या कडे आला. १६२९ मध्ये जिजामाता गरोदर असताना शहाजी राजांनी ५०० सैनिकांसह एका रात्रीत शिवनेरीवर नेले होते. माता जिजाऊने शिवनेरी गडावर भवानी मातेला नवस केला होता की, आपल्याला जर पुत्र प्राप्ती झाली तर तुझे नाव ठेवील. त्यानंतर १९३० मध्ये शिवाजी राजांचा जन्म झाला. त्यानंतर १९३२ मध्ये माता जिजाऊंनी किल्ला सोडला. १६३७ मध्ये किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. त्यानंतर इ.स.१६७३ मध्ये शिवनेरीचा किल्लेदार यांच्याशी फितुरी करुन किल्ला सर करण्याचा प्रयत्न राजा शिवाजीने केला होता. १६७८ मध्ये जुन्नर प्रांत लुटला गेला. मराठ्यांनी पुन्हा एकदा किल्ला घेण्याचा प्रयत्न केला. परंतु अपयशच आले. त्यानंतर ३८वर्षांनंतर हा किल्ला महाराजांनी मराठेशाहीत आणला. नंतर तो पेशव्यांकडे स्वाधीन करण्यात आला.
त्यामुळे शिवनेरी किल्ल्याला भारताच्या इतिहासात अन्यण्यासाधरण असे महत्व आहे.

भारत सरकारने या किल्ल्याला २६ मे १९०९ मध्ये महाराष्ट्रातील राष्ट्रीय स्वयंघोषित स्मारक म्हणून घोषित केले आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी पहायला मिळते. अनेक ऐतिहासिक गोष्टी किल्ल्यावर जतन करुन ठेवण्यात आलेल्या आहेत. चारही बाजूने हिरवाईने नटलेल्या सह्याद्रीच्या रांगा. त्यामुळे हा किल्ला अधिकच आकर्षक वाटतो. पुणे जिल्ह्यातील एक महत्वाचा किल्ला म्हणून याची ओळख आहे. सगळ्या किल्ल्यांमध्ये ‘शिवनेरी’ ला महत्वाचे स्थान आहे.                                                                                                                                                                                                               -प्रशांत श्रीमंदिलकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा