सातारा : औंध येथील दीपमाळ आज होणार प्रज्वलित

औंध ६ जानेवारी २०२३: महाराष्ट्रासह देशातील सर्वात उंच असलेली दीपमाळ आज शुक्रवार, दि.६ रोजी प्रज्वलित केली जाणार आहे. ऐतिहासिक दीपमाळेचे प्रज्वलन पाहण्यासाठी व देवीच्या छबिनोत्सवासाठी भाविक मोठ्या प्रमाणात औंध येथे दाखल होऊ लागले आहेत. आज रात्री ७.३० वाजता श्री यमाईदेवीची पारंपारिक पद्धतीने पूजन करून, श्री यमाईदेवी देवस्थानच्या मुख्य विश्र्वस्त गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन केले जाणार आहे.

औंध येथील ही दीपमाळ देशातील सर्वात उंच काळ्या पाषाणातील दीपमाळ आहे. ही दीपमाळ अतिशय कल्पकतेने प्रतिकूल परिस्थितीत उभी करण्यात आली असून, दीपमाळेची रचना अतिशय देखणी व सुंदर आहे. ही दीपमाळ पाच स्तारामध्ये उभी आहे. औंध राजघराणे, ग्रामस्त, आणि कर्नाटकातील हजारो भाविकांचे या दीपमाळेशी अतूट नाते आहे.

काळ्या पाषाणातील कारी नावाच्या दगडापासून दीपमाळेची दुरुस्ती करण्यात आली आहे‌. दीपमाळेचे वीजे पासून संरक्षण व्हावे म्हणून ७२ फूट लांब तांब्याच्या तारेचे तडीतवाहक ही बसवण्यात आले आहे. दीपमाळ प्रज्वलन व छबिनोत्सवाची औंध ग्रामनिवासिनी यमाईदेवी मंदिर व राजवाडा परिसरातील तयारी पूर्ण झाली आहे. सर्वत्र स्वच्छता व विधूत रोषणाई करण्यात आली आहे‌.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा