किरीट सोैमय्यांसह त्यांचा मुलगा नीलला ‘विक्रांत बचाव घोटाळ्यातून’ क्लीन चीट!

3

मुंबई, १५ डिसेंबर २०२२ : भाजप नेते किरीट सोमैय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमैय्या यांना विक्रांत बचाव घोटाळ्यातून क्लीन चीट मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, किरीट सोमय्या आणि त्यांचा नगरसेवक मुलगा नील सोमय्या यांच्याविरोधात कोणताही ठोस पुरावा सापडला नाही, अशी कबुली मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयात दिली आहे. या अहवालाबाबत कोर्टात लवकरच सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे.

काय आहे प्रकरण ?

आयएनएस विक्रांत बाचव मोहिमेतून मुंबईत ठिकठिकाणी लोकांकडून मदतनिधी उभारण्याचा घाट घालत सुमारे ५७ कोटींचा निधी जमा केल्याचा त्यांच्याविरोधात आरोप होता. मात्र या निधीचा सोमैय्या पिता-पुत्रांनी अपहार केल्याचा आरोप करून माजी सैनिक बबन भोसले यांनी ७ एप्रिल २०२२ रोजी तक्रार नोंदवली होती. त्यानुसार ट्रॉम्बे पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ४२९, ४०६ आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अटकपूर्व जामीनासाठी सोमैय्या पिता-पुत्रांना मुंबई सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारला होता.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा