मुंबई ,२४ ऑक्टोबर २०२२ : बॉलीवूड मेगास्टार सलमान खानला डेंगू आजाराने गाठला आहे. त्यामुळे डॉक्टरांनी त्याला पूर्णपणे आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे त्याच्या आगामी मूवी ‘किसी का भाई किसी की जान’, टायगर थ्री, आणि बिग बॉस च शूटिंग पूर्णपणे थांबवण्यात आलं आहे.
सलमान खान पुढच्या वर्षी अनेक धमाकेदार सिनेमे घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.बहुचर्चित ‘किसी का भाई किसी की जान’ या सिनेमापासून भाईजान बॉक्स ऑफिस वर धमाका करायला सुरुवात करणार आहे.
काही दिवसांपूर्वी सलमान खानने टायगर थ्री ईदला नाही. तर २०२३ च्या दिवाळीला प्रदर्शित होणार आहे. असं घोषित केलं होतं. या पाठोपाठ आता सलमान खानने त्याच्या आगामी ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपट ही पुढच्या वर्षी ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार असल्याची घोषणा केली आहे.
फरहाद सामजी दिग्दर्शित हा चित्रपट सलमान खान व्यतिरिक्त पूजा हेगडे, शहनाज गिल, पळक तिवारी, व्यंकटेश दगुपती, जगपती बाबू, राघव जूयाल, हे कलाकार या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव