जाणून घ्या, तुमच्या शहरातील आजचे पेट्रोल डिझेलचे दर

नवी दिल्ली, २५ डिसेंबर २०२२ आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्यानंतरही भारतीय बाजारात तेलाच्या किंमतीत फारसा बदल झालेला नाही. पेट्रोलियम कंपन्यांनी रविवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत. दिल्ली आणि चेन्नईत दर बदलले आहेत

त्यानुसार, आज दिल्लीत एक लिटर पेट्रोलचा भाव ९६.७२ रुपये प्रति लिटर तर डिझेलचा भाव ८९.६२ रुपये प्रति लिटर इतका आहे. मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये, कोलकात्यात पेट्रोल १०६.०३ रुपये व डिझेल ९२.७६ रुपये आहे. तर चेन्नईमध्ये पेट्रोल १०२.६३ रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर इतके आहे.

  • पुण्यात पेट्रोल १०६.१ रुपये

नाशिकमध्ये पेट्रोलचा दर १०६.७७ रुपये आहे, तर डिझेल ९३.२७ रुपये आहे. नागपूर जिल्ह्यात पेट्रोलचा दर १०६.१८ रुपये तर डिझेलचा दर ९२.७२ रुपये तर यवतमाळ शहरात पेट्रोलसाठी १०७.८० रुपये आणि डिझेलसाठी ९४.२९ रुपये मोजावे लागत आहेत. यासोबतच पुणे शहरात पेट्रोलचा दर १०६.०१ रुपये, तर डिझेलचा दर ९२. ५३ रुपये इतका आहे.

  • दररोज ६ वाजता किंमती बदलतात

दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी ६ वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किंमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा