कोच्चीमध्ये १८ मजली इमारत जमिनदोस्त

केरळ : कोच्चीमध्ये समुद्र किनाऱ्याजवळील अनधिकृत बांधलेल्या दोन लग्जरी अपार्टमेंटचे १५० फ्लॅट्स पाडण्यात आले. काही क्षणातच मोठ्या धमाक्याच्या आवाजात हि १८ मजली इमारत जमीनदोस्त करण्यात आली. या अनधिकृत इमारत जमीनदोस्त झाल्याचा व्हिडियो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
याबाबत स्थानिक अधिकारींनी दिलेल्या महितीनुसार, येथील अनधिकृत इमारती जमीनदोस्त करण्याचे काम शनिवारी आणि रविवारी सुरू राहणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने शनिवारी ही इमारती पाडण्याचे काम हाती घेतले आहे.
आज सकाळी येथील ( H2O ) हॉली फेथ अपार्टमेंट टॉवर स्फोटकं लावून पाडण्यात आले.
मदुराईमधील अनधिकृच इमारतींमध्ये हॉली फेथ, जैन कोरल कोव आणि गोल्डन कायालोरमचा समावेश आहे. शनिवारी आणि रविवारी या इमारती जमीनदोस्त करण्यात येणार आहेत.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा