कोहली म्हणजे क्रिकेटमधील रोनाल्डो: ब्रायन लारा

नवी दिल्ली : वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज ब्रायन लारा याने विराट कोहलीचे कौतुक करताना कोहली हा क्रिकेटचा रोनाल्डो आहे असे म्हटले आहे.
रोनाल्डो हा महान फुटबॉलपटू असून त्याच्याशी कोहलीची तुलना लाराने केली आहे.

लारा म्हणाला की, विराट कोहलीची खेळाप्रती असलेली वृत्ती पाहता सुपरस्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोची आठवण होते. कोहली हा क्रिकेटचा रोनाल्डोच आहे.
फलंदाजीत अविश्वसनीय कामगिरी करण्यासाठी कोहलीने स्वत:चा खेळ उच्च दर्जापर्यंत नेण्याबाबत मी कोहलीचा चाहता आहे.
विराटची तयारी आणि क्रिकेटप्रती त्याची समर्पित भावना वादातीत आहे. तो लोकेश राहुल किंवा रोहित शर्मापेक्षा अधिक प्रतिभावान आहे, असे नाही.

परंतु, स्वत:ला सज्ज करण्याची त्याची तयारी या दोघांच्या तुलनेत फारच वेगळी आहे. त्याच्या तंदुरुस्तीचा स्तर खूप उच्च आहे. दरम्यान, लाराने कोहलीला दिलेल्या या पावतीमुळे क्रीडाविश्वातून कोहलीची प्रतिमा उंचावल्याची चर्चा आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा