कोल्हापुर, ११ जानेवारी २०२३ : ‘इंडिगो’ची कोल्हापूर-बंगळुरू-कोईम्बतूर विमानसेवा शुक्रवारपासून (ता. १३) सुरू होत आहे. त्यामुळे ‘इंडिगो’ची विमानसेवा कोल्हापूरहून देशातील प्रमुख बत्तीस शहरांशी जोडली जाणार आहे. यामुळे कोल्हापूरमधील नागरिकांनी आभार मानले आहेत.
सध्या कोल्हापूर विमानतळावरून ‘इंडिगो’ची हैदराबाद, अहमदाबाद, तिरुपती विमानसेवा सुरू आहे. तर ‘स्टार एअर’ची कोल्हापूर-मुंबई विमानसेवा सुरू आहे. शुक्रवारपासून (ता.१३) ‘इंडिगो’ची कोल्हापूर-बंगळुरू-कोईम्बतूर नियमित विमानसेवा सुरू होत आहे. आठवड्यातील सातही दिवस ही विमानसेवा सुरू राहणार आहे.
सायंकाळी ४ वाजून ४५ मिनिटांनी विमान कोल्हापूर विमानतळवरून लँडिंग होईल, तर सायंकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी कोल्हापूरहून बंगळुरूसाठी विमान टेकऑफ होईल. या कार्यक्रमासाठी ना. ज्योतिरादित्य सिंधिया ऑनलाईन उपस्थित राहणार असून, त्यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या सेवेला प्रारंभ होत आहे.
यवेळी शाहू महाराज, खासदार धनंजय महाडिक. खासदार संजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह उद्योग, व्यापार व विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत, असे सांगण्यात आले आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर