दोघांना अटक; साहित्यही केले जप्त
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हयातील हातकणंगले तालुक्यातील माले मूडशिंगी गावात बॉम्ब साठा सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन सख्ख्या भावांना अटक केली आहे. ६९ बॉम्बसह काही साहित्यही मिळाले आहे. कोल्हापूरच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली.विलास राजाराम जाधव ( वय ५२), आनंदा राजाराम जाधव (वय ५४) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
त्यांनी बॉम्ब रानडुकरांची शिकार करण्यासाठी हे बॉम्ब बनविल्याची कबुली या दोन भावांनी दिली आहे. या घटनेमुळे कोल्हापूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा हुबळी स्टेशनवरील बॉम्ब स्फोटाशी कनेक्शन असण्याची शक्यता पोलीसांनी वर्तवली आहे.

