कोल्हापूर, २ जून २०२३: कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांची पुणे येथे बदली झाली. महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणच्या महासंचालकपदी बलकवडे यांची नियुक्ती झाली आहे. दरम्यान राज्य शासनाने त्यांच्या जागी अधाप कुणाचीही नियुक्ती केलेली नाही.
माजी जिल्हापोलिस प्रमुख शैलेश बलकवडे यांची गेल्याच आठवड्यात पुण्यात बदली झाली आहे. त्यानंतर प्रशासक डॉ. बलकवडे यांची बदली होणार अशी शक्यता व्यक्त केली जात होती. तत्कालीन आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांची ८ ऑक्टोबर २०२० ला बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी डॉ कादंबरी बलकवडे यांची महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती झाली होती.
महापालिका सभागृहाची मुदत १५ नोव्हेंबर २०२० ला संपली. कोरोनामुळे महापालिकेची निवडणूक झाली नाही. परिणामी आयुक्त डॉ बलकवडे यांचीच प्रशासक म्हणून राज्य शासनाने नियुक्ती केली. महापालिकेच्या ३८ वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन वर्षांपेक्षा जास्त काळ प्रशासकांकडे महापालिकेचा कारभार राहिला आहे. त्यामुळे डॉ बलकवडे या महापालिकेतील सर्वाधिक काळ प्रशासकपद भूषविणार्या अधिकारी ठरल्या आहेत.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर