कोल्हापुरात अखेर मटणाच्या दराचा प्रश्न सुटला

कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून मटणाचे दर वाढल्याने कोल्हापूरकरांनी मटण खाणे अवघड झाले होते. त्यामुळे कोल्हापूरकर फार अस्वस्थ झाले होते. गेल्या महिन्यापासून मटण जवळपास ६००रुपये किलोच्या आसपास झाले होते. त्यामुळे मटणाचे दर कमी करण्यासाठी कोल्हापूरकरांनी वेगवेगळ्या पध्द्तीने निदर्शने केली होती. हा दर वाढीचा विषय जिल्हाधिकाऱ्यांपर्यत पोहोचला होता.त्यामुळे कोल्हापूरकरांना मटण खाणे अवघड झाले होते.

परंतु आज सकाळी खाटीक समाज आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या बैठक झाली. या बैठकीत मटणाचा ४८०रुपये अंतिम दर ठरविण्यात आला. या दराचे कोल्हापूरकरांनी स्वागत केले. त्यामुळे गेल्या महिन्याभरापासून मटण खाण्यासाठी अस्वस्थ असणारे कोल्हापूरकरांना आता मनसोक्त मटण खाता येणार आहे.

या दरवाढीच्या तोडग्यांबाबत खासदार संजय मंडलिक म्हणाले की, मटण दराचा प्रश्न अखेर सुटला आहे. त्यामुळे सामान्यांना दिलासा मिळाला आहे. कोल्हापूर ही खवय्यांची नगरी आहे. त्यामुळे या दरवाढीने फटका बसला होता. कोल्हापुरातले कार्यकर्तेही स्वाभिमानी आहेत. कुठलाही प्रश्न हातात घेतला की तडीस नेतात. अनेक तालमीमध्ये ही त्यामुळे दरवाढीला विरोध होता.
कोल्हापुरात जन्माला येणारं बाळ दुधाबरोबर तांबडा-पांढरा पिऊनच मोठं होतं, असं असताना वेळी योग्य दरात नागरिकांना मटण मिळणे गरजेच बनले आहे. त्यामुळेच हा वाद मिटेपर्यंत सार्वजनिक मंडळांनी मटणाचे स्टॉल्स उभा केले होते. एकीकडे स्वस्त दरात मटण दिले जात होते. नागरिक गर्दी करत होते, तर दुसरीकडे पारंपरिक पद्धतीने विक्री करणाऱ्या दुकानांसमोर शुकशुकाट होता. भर रस्त्यात रांगा लावून नागरिक मटण विकत घेत होते.

जिल्हाधिकाऱ्यांकडे हा वाद पोहोचल्यानंतर त्यांनी एक समिती स्थापन केली. या समितीला अहवाल देण्याचे आदेशही त्यांनी दिले होते. एका वेगळ्या विषयाला सामोरं जावं लागत असल्याचंही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी बोलून दाखवले. हा वाद फक्त कोल्हापूर शहरापुरता मर्यादित राहिला नाही. तर ग्रामीण भागातही पोहोचला. गारगोटी आणि कडगाव ग्रामपंचायतीने देखील यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ११ डिसेंबर रोजी यावर सुनावणी आहे. खाटीक समाज मात्र बकऱ्यांची आवक कमी झाल्यानं दर वाढल्याचे सांगत आहेत.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा