कोल्हापुरात बेमुदत काळासाठी मटण विक्री बंद

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रासह राज्यभरात कोल्हापूरचा तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा प्रसिद्ध आहे. मात्र कोल्हापुरात पुन्हा एकदा मटणाच्या किंमतीवरून वाद सुरू झाला असून विक्रेत्यांनी कोल्हापूरमध्ये बेमुदत काळासाठी मटणविक्री बंद केली आहे. बकरी महाग झाल्याने तसेच कृती समिती दर कमी करण्यावर अडून बसल्याने मटण विक्रेत्यांनी हा निर्णय घेतला आहे. अशी माहिती समोर येत आहे.

मटणविक्री बेमुदत बंद करण्यासोबत मार्टेकमध्ये ठिय्या आंदोलनही सुरू केले आहे. यावेळी घोषणाबाजीही करण्यात आली.
मटणाचे दर वाढल्यामुळे अस्वस्थ झालेल्या कोल्हापुरकरांना मटणाला ४८० रुपये किलो एवढा दर खाटीक समाजाने मान्य केला होता. यानंतर कोल्हापूरकरांनी मटणाचा वाद सुटला म्हणून जल्लोषही केला. मात्र बकरी महाग होत असताना कृती समिती दर कमी करण्याचा आग्रह करत असल्यामुळे मटण विक्रेते वैतागले आणि त्यांनी बेमुदत बंदची हाक दिली.
मटण विक्रेत्यांनी बेमुदत बंदचा निर्णय घेतला आणि ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळी ‘मटणाचा दर आमचा अधिकार’ अशा घोषणाही देण्यात आल्या.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा