रोमहर्षक सामन्यात कोलकत्ता चा पराभव, राजस्थानने शेवटच्या षटकात 2 गडी राखून मिळवला विजय

RR Vs KKR, 19 एप्रिल 2022: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 मध्ये 18 एप्रिल रोजी एक रोमांचक सामना पाहायला मिळाला. राजस्थान रॉयल्स (RR) ने कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) 7 धावांनी पराभव केला आणि शेवटच्या षटकात विजयाची नोंद केली. आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या ओबेद मॅकॉयने शेवटच्या षटकात दोन विकेट घेत आपल्या संघाला विजय मिळवून दिला.

या सामन्यात राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करत जोस बटलरच्या शतकाच्या जोरावर 217 धावा केल्या. प्रत्युत्तरात कोलकाता नाईट रायडर्सला केवळ 210 धावा करता आल्या आणि अखेरच्या षटकात सामना गमावला. एकेकाळी कोलकाता हा सामना जिंकेल असे वाटत होते, पण अखेरच्या षटकात सारे काही बदलले.

शेवटचा ओव्हर ड्रामा… (6 चेंडूत 11 धावा आवश्यक)

19.1 षटके – 2 धावा
19.2 षटके – शेल्डन जॅक्सन बाद
19.3 षटके – 1 धाव
19.4 षटके – उमेश यादव बाद

राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर जोस बटलरनेही या सामन्यात शतक झळकावले आहे. बटलरने 61 चेंडूत 103 धावा केल्या. जोस बटलरचे या मोसमातील हे दुसरे शतक आहे आणि तो ऑरेंज कॅपधारकही आहे.

युझवेंद्र चहलने या मोसमातील घेतली पहिली हॅट्ट्रिक

इंडियन प्रीमियर लीग 2022 मध्ये राजस्थान रॉयल्सचा फलंदाज जोस बटलरची बॅट जोरदार बोलत आहे. जोस बटलरने 18 एप्रिल रोजी कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध शानदार शतक झळकावले. या मोसमातील त्याचे हे दुसरे शतक आहे.

हॅट्ट्रिक मध्ये हे खेळाडू झाले बाद…

16.4 षटके – श्रेयस अय्यर बाद
16.5 षटके – शिवम मावी बाद
16.6 षटके – पॅट कमिन्स बाद

कोलकाता नाईट रायडर्सचा डाव

पहिली विकेट – सुनील नरेन 0 धावा, (0/1)
दुसरी विकेट – आरोन फिंच 58 धावा (107/2)
तिसरी विकेट- नितीश राणा 18 धावा (148/3)
चौथी विकेट – आंद्रे रसेल 0 धावा (149/4)
पाचवी विकेट- व्यंकटेश अय्यर 6 धावा (178/5)
सहावी विकेट- श्रेयस अय्यर 85 धावा (180/6)
7वी विकेट – शिवम मावी 0 धावा (180/7)
आठवी विकेट – पॅट कमिन्स 0 धावा (180/8)
9वी विकेट – शेल्डन जॅक्सन 8 धावा (209/9)
दहावी विकेट – उमेश यादव 21 धावा (210/10)

राजस्थान रॉयल्सचा डाव (217/5, 20 षटके)

जोस बटलर पुन्हा एकदा राजस्थान रॉयल्ससाठी सर्वात मोठा हिरो म्हणून उदयास आला. जोस बटलरने तुफानी खेळी खेळत या मोसमातील दुसरे शतक झळकावले. जोस बटलरने प्रथम देवदत्त पडिक्कलसोबत 97 धावांची भागीदारी केली आणि नंतरही धावांची गती कायम ठेवली. जोस बटलरने एकूण 103 धावा केल्या.

त्याच्याशिवाय कर्णधार संजू सॅमसनही जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला, संजूने अवघ्या 19 चेंडूत 38 धावा केल्या. त्यांच्याशिवाय रियान पराग आणि करुण नायर या वेळी पुन्हा अपयशी ठरले. पण शेवटी शिमरॉन हेटमायरने 13 चेंडूत 26 धावांची तुफानी खेळी करत संघाला 217 धावांपर्यंत नेले.

पहिली विकेट – देवदत्त पडिककल 24 धावा (97/1)

दुसरी विकेट – संजू सॅमसन 38 धावा (164/2)
तिसरी विकेट- जोस बटलर 103 धावा (183/3)
चौथी विकेट – रियान पराग, 5 धावा (189/4)
पाचवी विकेट – करुण नायर 3 धावा, (198/5)

कोलकाता नाइट रायडर्स प्लेइंग-11: व्यंकटेश अय्यर, आरोन फिंच, श्रेयस अय्यर, नितीश राणा, आंद्रे रसेल, शेल्डन जॅक्सन, सुनील नरेन, पॅट कमिन्स, शिवम मावी, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती

राजस्थान रॉयल्स प्लेइंग-11: जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन, करुण नायर, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रणंद कृष्णा, ओबेद मॅककॉय, युझवेंद्र चहल

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा