ऑनलाईन स्ट्रीमिंग करणाऱ्या कोरियन महिलेची काढली छेड, दोन जणांना अटक

4

मुंबई, १ नोव्हेंबर २०२२ : मुंबईत आलेल्या कोरियन महिलेची काही स्थानिक तरुणांकडून छेड काढण्यात आली. ही कोरियन महिला ऑनलाईन स्ट्रीमिंग करत असताना स्कूटरवरून २ तरुण तिच्या बाजूला येऊन उभे राहिले. आधी त्यातील एक तरुणांनी कोरियन महिलेला तिचे नाव विचारले. त्यानंतर त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे. महिलेसोबत अश्लील वर्तनही केले आहे. त्या २ तरुणांचा वर्तन पाहून कोरियन महिला त्या तिथून दूर जाण्याचा प्रयत्न करत होती. मात्र त्या २ तरुणांनी स्कूटरवर त्या महिलेचा पाठलाग केला आहे.

याबाबत माहिती देताना मुंबई पोलिसांनी सांगितले की,
मोबीन चंद मोहम्मद शेख आणि मोहम्मद नकीब सदरेलम अन्सारी या दोन तरुणांना लाइव्ह स्ट्रिमिंगदरम्यान एका कोरियन युट्यूबरचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. खार पोलिसांनी आयपीसी ३५४ अंतर्गत एफआयआर नोंदवला असून दोनही आरोपींना ताब्यात घेतले आहे

  • व्हिडिओ प्रचंड व्हायरल

हे सर्व कोरियन महिला ऑनलाइन स्त्रिमिंग करत असताना रेकॉर्ड ही झाले आहे. कोरियन महिला सोबत झालेला सर्व प्रकार महिलेने सोशल मीडियावर टाकला आहे. महिलेसोबत झालेला सर्व प्रकाराचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. मुंबईच्या खार परिसरात हा सर्व प्रकार घडला आहे. दरम्यान पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा