मुंबई : भीमा कोरेगाव प्रकरणी केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला धक्का दिला आहे. शरद पवार यांनी हे प्रकरण लावू धरतात भीमा कोरेगाव प्रकरणाचा पुढील तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयए करणार आहे. अशी माहिती केंद्रीय गृहखात्याने राज्य सरकारला दिली आहे.
कोरेगाव भीमा दंगल हे तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारचं षडयंत्र आहे. भीमा कोरेगाव प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याची मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली होती. त्याबाबतच पत्र शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलं होतं. मात्र, त्यापूर्वीच केंद्र सरकारने हे प्रकरण एनआयएकडे सोपवलं आहे.
शरद पवारांनी भीमा कोरेगाव दंगल प्रकरण लावू धरताच केंद्र सरकारने त्यात हात घातला. आता हे प्रकरण थेट एनआयएच्या हातात देण्यात आलं आहे. भीमा कोरेगाव प्रकरणाचा पुढील तपास आता एनआयए करणार आहे. त्यामुळे सध्या केंद्र विरुद्ध राज्य सरकार असं चित्र निर्माण झालं आहे. दुसरीकडे, केंद्राच्या या निर्णयावर महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांकडून टीका केली जात आहे.
याबाबत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, ‘महाराष्ट्र राज्य सरकारने कोरेगाव-भीमा घटनेच्या मुळाशी जाण्याचे ठरविल्यानंतर केंद्र शासनाने हस्तक्षेप करून राज्य शासनाची कोणतीही परवानगी न घेता हा तपास NIA कडे दिला. हे घटनेच्या विरोधात आहे. केंद्राच्या या निर्णयाचा मी निषेध करतो’, असं ट्वीट अनिल देशमुख यांनी केलं.