कौटुंबिक वादातून वडील व मुलीस मारहाण; आरोपी अटकेत

13

अमरावती, दि.२२ मे २०२०: अमरावती जिल्ह्यातील दर्यापुर तालुक्यातील खल्लार पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या साखरी येथे हे गुरुवारी ( दि.२१) संध्याकाळी कौटुंबिक वादातून चौघांनी वडील व मुलीस मारहाण केल्याची घटना घडली.

साखरी येथील अशोक डहाके व दिलीप डाहके हे सख्खे भाऊ असून यांचा कौटुंबिक वाद निर्माण झाला. त्याच वादातून दिलीप डहाके, ऋषिकेश डहाके, अनिकेत डाहके , कांचन डहाके यांनी संगनमत करून अशोक डाहके यांच्या पाठीवर कमरेवर काठीने मारहाण केली.

अशोक डहाके यांची मुलगी ही भांडण सोडविण्याकरिता गेली असता अनिकेत डहाके यांनी तिच्या पोटावर लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. या संपूर्ण घटनेची तक्रार गंगा डाहके यांनी खल्लार पोलीस स्टेशन येथे दाखल केली. अनिकेत डहाके, दिलीप डहाके, कांचन डहाके, ऋषिकेश डहाके यांच्याविरुद्ध आपण अप न ९७/ २० कलम ३२४ ,४५२, ५०६, ५०४ या नुसार गुन्हा दाखल केला असून आरोपीस अटक केली आहे.

पुढील तपास पोलीस स्टेशनचे ठाणेदार अभिजीत अहिरराव यांच्या मार्गदर्शनात दुय्यम ठाणेदार आशिष गद्रे पोलीस हेडकॉन्स्टेबल अशोक सावरकर, राजेंद्र देशमुख ,संतोष चव्हाण, बबिता ढोके करीत आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: