नवी दिल्ली, १३ फेब्रुवरी २०२१: कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत लसीकरण झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची आणि आघाडीवरील कर्मचाऱ्यांची संख्या काल ७७.६६ लाखांवर पोहोचली आहे. आतापर्यंत लसीकरणाच्या १,६३,५८७ सत्रांमध्ये ७७,६६,३१९ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. यामध्ये ५८,६५,८१३ आरोग्य कर्मचारी(५८.९%) आणि प्रमुख आघाड्यांवर काम करणाऱ्या १९,००,५०६ (२१.२%) कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
कालच्या २८ व्या दिवशी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत एकूण २,६१,३०९ लाभार्थ्यांचे कोविड१९ प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. यामध्ये ५०,८३७ आरोग्य कर्मचारी आणि प्रमुख आघाड्यांवर काम करणाऱ्या २,१०,४७२ कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
३५ राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांमध्ये काल कोविड प्रतिबंधक लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. बारा राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांनी, नोंदणी केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी ७०% हून अधिक कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण केले. ही राज्ये आहेत- बिहार, त्रिपुरा, मध्य प्रदेश, ओदिशा, उत्तराखंड, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, केरळ, लक्षद्वीप, मिझोराम, राजस्थानआणि सिक्कीम.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे