कृपा करुन मला छत्रपती शिवाजी महाराज म्हणू नका असे म्हणाले होते यशवंतराव चव्हाण

पाकिस्तानशी १९६५ मधे झालेल्या युद्धात भारताने पाकिस्तानचे शेकडो पॅटन टँकस (अत्याधुनिक रणगाडे) उद्ध्वस्त केले. अनेक सेबरजेट्स (अत्याधुनिक विमाने) आकाशातच धुळीला मिळविली. हा अमेरिकन युध्दसाहित्याचा जागतिक माज होता. १९६२ मधील चिनशी झालेल्या युध्दातील नामुष्कीचा भारताने घेतलेला बदला होता. भारताचे सेनादल लाहोरच्या वेशी पर्यंत पोहचले होते. आणि मराठी वृत्तपत्रे आचार्य अत्रे यांचे भाषणाचे प्रेरणेतून समकालीन संरक्षण मंत्री सुस्मृत मा.यशवंतराव चव्हाण साहेबांना ” प्रति शिवाजी महाराज” संबोधू लागले. पुण्यात भारताच्या या कर्तबगार नेत्याच्या जाहिर अभिनंदन सभासोहळ्यात आचार्य अत्रे यांनी ती घोषणा केली. परंतु त्याच सभेत उत्तरादाखल केलेल्या भाषणात यशवंतराव चव्हाण साहेबांनी तात्काळ अशी तुलना नाकारली..

” युगायुगातून एखादे शिवाजी महाराज जन्म घेतात. कृपा करून मला शिवाजी महाराज म्हणू नका..!”
यशवंतरावजी सुविद्य, द्विपधवीधर, उत्कृष्ट प्रशासक, संसदपटू आणि स्वातंत्र्य आंदोलनात भरीव योगदान दिलेले नेते होते..
आणि दंगलखोरी दगाबाजी सारख्या दुष्कृत्यांचा त्यांच्या कर्तबगारीवर रक्तरंजित डाग नव्हता.. ..!!

आज त्यांचं मोठेपण आणि वेगळेपण प्रकर्षानं जाणवतं

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा