सायनाने अकादमी सोडल्यामुळे मला आजही वेदना: गोपीचंद

मुंबई : माझी अकादमी सायना नेहवाल सोडून गेली. यामुळे मला आजही वेदना होत आहेत, असे मत बॅडमिंटमनपटू व प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी व्यक्त केले आहे.
पुलेला गोपीचंद याने आपल्या आगामी पुस्तकात अनेक गोष्टींचा खुलासा केला असून या पुस्तकाचे २० जानेवारी रोजी प्रकाशन होणार आहे.

एका कार्यक्रमाप्रसंगी गोपीचंद म्हणाले की, मी अनेक बॅडमिंटनपटूंना मार्गदर्शन करत होतो, मात्र सायनाकडे कधीही दुर्लक्ष केले नाही. कदाचीत हीच बाब सायनाला समजाविण्यात मी कमी पडलो.
सिंधूने २०१२ ते २०१४ या काळात फार चांगली प्रगती केली होती. पदुकोन यांनीच सायनाला हैदराबाद सोडण्यास प्रोत्साहन दिले.
माझ्यासाठी हा धक्का होता. पदुकोन यांच्याकडूनच मी खेळाची प्रेरणा घेतली ते माझ्याशी असे का वागले याची मला आजही खंत आहे. २०१४ मध्ये जागतिक विजेतेपद स्पर्धेनंतर सायनाने पदुकोन यांच्या अकादमीत प्रवेश घेतला. अकादमी सोडून जाऊ नये, यासाठी मी सायनाला खुप समजावले.
परंतु, ती कोणाच्या तरी प्रभावाखाली होती आणि तिचा निर्णय आधीच झाला होता. त्यामुळे मी नंतर तिला समजावणे बंद केले.
दरम्यान, सायनाच्या या निर्णयामागे माजी बॅडमिंटमनपटू व प्रशिक्षक प्रकाश पदुकोन असल्याचे गोपीचंद यांनी म्हटल्यामुळे क्रीडाविश्वातील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आले आहेत.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा