नाशिक २० फेब्रुवारी २०२५: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी मुख्यमंत्री कोट्यातून बनावट कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्या प्रकरणी त्यांना व भाऊ विजय कोकाटे यांना प्रत्येकी दोन वर्षाची शिक्षा आणि ५० हजार रुपये दंड भरण्याची शिक्षा देण्यात आली आहे. माणिकराव कोकाटे हे अजित पवार गटाचे नेते आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात ठिणगी उडाली असून यामुळे माणिकराव कोकाटे यांची आमदारकी आणि मंत्रिपद धोक्यात आले आहे.
माहितीनुसार कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने २ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी त्यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती. या याचिकेत त्यांनी १९९५ साली मुख्यमंत्री कोट्यातून कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप केला होता. कृषिमंत्री यांच्यावर ४२०,४६५,४७१ आणि ४७अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला होता.
शासनाकडून ज्या सदनिका दिल्या जातता ते माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधु सुनील कोकाटे यांना मिळाल्या होत्या. परंतु त्यांनी त्यावेळी आमचे उत्पन्न कमी असून आम्हाला दुसरे घर नाही अशी माहिती त्यांनी शासनाला दिली होती. पण अधिकाऱ्यानी या संदर्भात नाशिकच्या सरकारवाडा पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. आता या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात अजून चार जणांचा समावेश असल्याने त्या चार आरोपीना सुद्धा अटक करण्यात आली आहे. या चार आरोपीपैकी कोर्टाने उर्वरित दोघांना कोणतीही शिक्षा अजून सुनावलेली नाही.