KTM ची नविन ड्यूक-२०० बाईक लाँच, सुझुकी-जिक्सर बजाज-पल्सर अपाचे-RTR शी करणार स्पर्धा

नवी दिल्ली २८ जून २०२३: KTM इंडियाने आता भारतात, आपली अपडेटेड ‘KTM ड्यूक-२००’ बाईक लॉन्च केलीय. नवीन KTM ड्यूक-२०० मध्ये, फुल एलईडी हेडलॅम्प सेटअप देण्यात आलाय. हेडलॅम्प युनिटला बीमसाठी ६ रिफ्लेक्टरसह ३२ LEDs चा सेट असून हेडलॅम्प LED डेटाइम रनिंग लाइट्स (DRLs) ने लावलेले आहेत. याशिवाय या मॉडेलच्या बाइकमध्ये कोणतेही मोठे बदल करण्यात आलेले नाहीत.

ऑस्ट्रियन बाईक मेकर कंपनीने या नेकेड स्ट्रीट फायटर बाईकसह भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला होता. ही KTM ची सर्वात जास्त विक्री होणारी बाइक मॉडेल आहे. आता नवीन KTM-२०० ड्यूक ही भारतात अॅडव्हेंचर बाइक सेगमेंटमध्ये, बजाज पल्सर NS२००, TVS अपाचे RTR-२००/४V आणि सुझुकी जिक्सर-२५० यांच्याशी स्पर्धा करेल.

KTM 200 ड्यूक कंपनीने १.९६ लाख (दिल्ली, एक्स-शोरूम) किंमतीला लॉन्च केली आहे आणि सध्याच्या मॉडेलपेक्षा ३१५५ अधिक महाग ही झाली आहे. ही बाईक इलेक्ट्रॉनिक ऑरेंज आणि मेटॅलिक सिल्व्हर या दोन रंगात उपलब्ध आहे. या बाईकला एलसीडी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळेल, जे रायडर ला बरीच माहिती दाखवते. या लेटेस्ट अॅडव्हेंचर बाइकच्या पुढील आणि मागील बाजूस डिस्क ब्रेक असेल. यात ड्युअल-चॅनल ABS, USF फोर्क, मागील बाजूस १०-स्टेप अॅडजस्टेबल मोनोशॉक, ट्यूबलेस टायर्ससह अलॉय व्हील, अंडरबेली एक्झॉस्ट यांसारखी प्रगत वैशिष्ट्ये आहेत.

KTM-२०० ड्यूकच्या नवीन आवृत्तीमध्ये जुन्या मॉडेलप्रमाणे १९९.५ CC सिंगल सिलेंडर, लिक्विड कूल्ड इंजिन देण्यात आलय. हे इंजिन १०००० rpm वर २४ bhp पॉवर आणि ८००० rpm वर १९.२ Nm पीक टॉर्क जनरेट करते. ट्रान्समिशनसाठी इंजिन ६-स्पीड गिअरबॉक्ससह सेट केलेले आहे. KTM-३९० ड्यूक मॉडेलच्या तुलनेत, नवीन ड्यूक मध्ये क्विक शिफ्टर नसणार आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा