कुकडीचे आवर्तन सहा जून रोजी सुटणार : आमदार रोहित पवार

कर्जत, दि.३१.मे.२०२०: कुकडीचे आवर्तन सहा जून रोजी सुटणार आहे, अशी माहिती कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी दिले. राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी हा निर्णय जाहीर केला.

सविस्तर वृत्त असे की, कुकडीचे आवर्तन सुटणार असल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे सध्या उन्हाची तीव्रता वाढल्याने पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली. त्याचप्रमाणे पिकांना देखील पाणी कमी पडले आहे. पाण्याअभावी पिके जळू लागली आहेत. सर्व पाझर तलाव विहिरी कोरड्या पडलेल्या पाहण्यास मिळत आहेत.

त्यामुळे उन्हाळी आवर्तन तात्काळ सोडावे, अशी मागणी शेतकरी करीत होते. त्याच पार्श्वभूमीवर पुणे येथे आमदार रोहित पवार यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेतली.

भेटी दरम्यान आमदार रोहित पवार यांनी कुकडीचे पाणी सोडावे असे निवेदन दिले. यांवर जयंत पाटील यांनी ३० मे रोजी निर्णय झाला की, ६ जूनला आवर्तन सोडण्यात येणार आहे असे सांगितले . या निर्णयामुळे शेतकरी वर्ग आनंदी आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी:जयहिंद पौरष

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा