कुलभूषण जाधव यांची बाजू मांडणार पाकिस्तानी वकील?

राष्ट्रीय :  हेरगिरी केल्याच्या आरोपावरून तेथील पाकिस्थानी लष्करी न्यायालयाने भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती. मात्र, या शिक्षेला भारताने तातडीने आंतरराष्ट्रीय न्यायालयात आव्हान दिले. कुलभूषण जाधव हे सध्या पाकिस्तानच्या ताब्यात असून त्यांच्याशी संबंधित एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.
कुलभूषण जाधव प्रकरणी यापुढे होणाऱ्या सुनावणीसाठी त्यांची बाजू पाकिस्तानी व्यक्तीच मांडेल असे सांगण्यात येत आहे.अशी माहिती तेथील सूत्रांकडून देण्यात येत आहे.

भारताने पाकिस्तानच्याच कोणत्या तरी वकिलास पॉवर ऑफ अटॉर्नी द्यावी असे सांगण्यात येत आहे. पाकिस्तानने भारतासमोर ही अट ठेवल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

कुलभूषण जाधव प्रकरणाची आतंरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी त्यांचा कॉन्सुलर एक्सेस भारतीय उच्चायोगाकडे ठेवण्याचा अधिकार देण्यात आला.
पाकिस्तानकडून कुलभूषण जाधव यांचे अपहरण करण्यात आले आहे. ते गुप्तहेर नाहीत, असा युक्तिवाद भारताचा आहे. कुलभूषण जाधव हे भारतीय नौदलातून निवृत्त झाले आहेत.

एप्रिल २०१७ मध्ये पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना शिक्षा सुनावल्यानंतर लगेचच मे २०१७ मध्ये भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. त्यानंतर १८ मे २०१७ रोजी या खटल्याचा निकाल देत नाही, तोपर्यंत कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेची अंमलबजावणी करू नये, असे आदेश १० न्यायाधीशांच्या पीठाने पाकिस्तानला दिले.

पाकिस्तानकडून व्हिएन्ना कराराचे उल्लंघन झाले आहे. भारताच्या उच्चायुक्तांना जाधव यांना भेटण्यास परवानगी दिली जात नाही, असेही भारताने न्यायालयात म्हटले आहे. कुलभूषण जाधव यांची तातडीने सुटका करावी, अशी मागणी भारताने न्यायालयात केली होती.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा