Kunal Kamras reaction: स्टँडअप कोमेडियन कुणाल कामराने एका शोमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गाण सादर केले. ज्याच्यात त्याने एकनाथ शिंदेचा गद्दार म्हणून उल्लेख केला. त्यानंतर ते गाण सोशल मिडियावर व्हायरल झाले आणि शिवसैनिकांनी त्याचा स्टुडिओ फोडला. कुणाल कामरावर या संपूर्ण प्रकरणावरून गुन्हा देखील दाखल झाला आहे. पण अजून कुणाला कामराने माफी मागितलेली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश सुद्धा बजावले होते. परंतु, कामराने मी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची माफी मागणार नसल्याचे सांगितले आहे. याशिवाय मी कोणाला घाबरत नाही.अशी कुणाला कामराने प्रतिक्रिया दिली आहे.
कुणाल कामराने एक्स पोस्टवर केलेल्या निवेदनात म्हटले की, “मनोरंजन स्थळे हे फक्त एक व्यासपीठ आहे. सर्व प्रकारच्या शोसाठी एक जागा आहे. माझ्या विनोदासाठी हॅबिटॅट किंवा इतर कोणतेही ठिकाण जबाबदार नाही, किंवा मी काय बोलतो यावर कोणाचाही अधिकार नाही.” पुढे त्याने म्हटले की, ‘एखाद्या विनोदी कलाकारच्या शब्दासाठी एखाद्या ठिकाणी हल्ला करणे हे तुम्हाला दिलेले बटर चिकन आवडले नाही म्हणून टोमॅटो घेऊन जाणारा ट्रक उलटवण्याइटकेच मूर्खपणात आहे.’
पोलिसानी व न्यायालयाने माझ्याविरोधात कायदेशीर कारवाई करावी. मात्र, कायदा सर्वांसाठी सामान आहे. त्यामुळे ज्या लोकांनी हॉटेल फोडल आहे तसेच जे निवडून आलेले नाहीत, अशा महापालिका सदस्यांच्या विरोधात सुद्धा कारवाई झाली पाहिजे. असा सवलाही त्याने यावेळी केला.
न्यूज अनकट प्रतिनिधी, प्रथमेश पाटणकर