कर्जत, दि. ६ जून २०२०: कर्जत तालुक्यातील तरडगाव येथे रात्री शेतात काम करत असताना नानासाहेब केसकर आणि संतोष केसकर यांनी एका हरिणीला पाडसाला दुध पाजत असताना पाहिले. हरिणी पाडसाला पाजत असतानाच का भक्षक कुत्र्यांनी त्यांच्या वर हल्ला केला. या जीवघेण्या हल्लातून या दोन युवकांनी हरिणीला व पाडसाला कुत्र्यांपासून सोडवले आहे. या नंतर वन विभागाला त्यांची माहिती देऊन दोन्ही जखमी हरणींला व पाडसाला वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले. या दोन्ही हरणींना रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
या बाबतीत सविस्तर वृत्त असे की, नानासाहेब केसकर आणि संतोष केसकर हे आपल्या शेतात नेहमी प्रमाणे काम करत होते. या वेळी शेताच्या जवळच अंतरावर त्यांच्या असे निदर्शनास आले कि, कुत्र्यांनी एका हरणीला पकडले होते. हे पाहताच ते धावतच घटनास्थळी गेले.या कुत्र्यांच्या तावडीतून हरिणी आणि पाडसाला त्यांनी तात्काळ सोडवले.
या नंतर त्यांच्या मदतीला श्रीराम काळे, दिनकर मदने, अशोक देवकाते, अशोक केसकर, या सह काही युवक मदतीला धावून आले. या सर्वांनी मिळून वन विभागाचे अधिकारी कर्जत या बाबत माहिती दिली. वन विभागाची जीप त्या ठिकाणी येऊन या दोन्ही हरिणी आणि पाडसाला घेऊन रूग्णालयात आले. युवकांच्या सतर्कतेमुळे दोन जीव वाचले आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष