क्यार चक्रीवादळामुळे गोवा,पणजीचे जनजीवन विस्कळीत

गोवा: अरबी समुद्रात उसळलेल्या क्यार चक्रीवादळामुळे गोव्यात मुसळधार पाऊस पडला.पाऊस आणि वारा एवढा भयानक होता की, काही क्षणात येथील जनजीवन विस्कळीत झालं. त्यामुळे नागरिकांची एकच धांदल उडाली आहे.

क्यार चक्रीवादळामुळे सध्या पणजीसह गोव्यात मोठ्या प्रमाणात सुमारे ८०ते १००किमी वेगाने वारे वाहत आहेत. त्यामुळे पणजी शहर तर अक्षरशः जलमय झाले होते. पावसाचा जोर वाढल्याने नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.

पावसाचा जोर कायम असल्याने काही ठिकाणी झाडे कोलमडून पडली असून रस्त्यावर पाणी साचल्याने रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. सध्या दिवाळीच्या सुट्टीनिमित्त पर्यटक गोव्यात फिरायला येतात.परंतु क्यार चक्रीवादळामुळे येथील जनजीवन विस्तकाळीत झाले आहे. त्यामुळे परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा