पुणे, ७ एप्रिल २०२१: देशात करोना च्या बाबतीत पुणे पुन्हा एकदा पहिल्या स्थानावर आले आहे. काल म्हणजेच मंगळवारी पुण्यात एकाच दिवसात ११,००० नवीन कोरोना प्रकरणे समोर आली आहेत. पुण्यातील वाढत्या प्रादुर्भावामुळे काल अशी वेळ आली होती की पुण्यात एकही आईस यू बेड उपलब्ध नव्हता. पुणे महानगरपालिकेच्या प्रयत्नातून २० नवीन आय सी यु बेड तयार करण्यात आले होते मात्र संध्याकाळपर्यंत तेही भरले गेले.
मंगळवारी सायंकाळपर्यंत रुग्णांसाठी व्हेंटिलेटरसह फक्त एक आयसीयू बेड आणि इतर नऊ आयसीयू बेड उपलब्ध होते. मंगळवारी रात्री ९ वाजता महानगरपालिकेच्या माहितीप्रमाणे १२ व्हेंटिलेटर आणि १२ आय सी यु बेड उपलब्ध होते. पण पुढील काही तासातच हे बेड भरले गेले. महत्त्वाचं म्हणजे ३१ मार्च पासून पुण्यातील खासगी रुग्णालयांमध्ये देखील ८० टक्के बेड हे कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आले होते.
पीएमसीच्या कार्यक्षेत्रांतर्गत असलेल्या सार्वजनिक आणि खासगी रुग्णालयांमधील एकूण ७,८११ कोविड रुग्णालयातील बेडपैकी मंगळवारी रात्री १,०९२ रिकामे होते. यामध्ये आयसोलेशन ची व्यवस्था नसलेले आणि ऑक्सिजन विना ६९१ बेड् उपलब्ध होते. तर ३७७ ऑक्सीजन सपोर्ट असलेले बेड उपलब्ध होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे