नाशिक, दि.८ जून २०२०: देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. मुंबईत तर कोरोनाने कहर केला आहे. राज्य सरकारने ढिसाळ निर्णय घेतले म्हणून महाराष्ट्रात प्रादुर्भाव वाढल्याचा आरोप नाशिकचे माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. कोरोना उपचारात राज्य सरकारच्या नियोजनाचा मोठा अभाव दिसून आला आहे. त्यातच सत्ताधारी पक्षातील अनेक नेते अजून घराच्या बाहेर निघत नसल्याचा टोला महाजन यांनी लावला आहे.
फक्त हात धुवा, सॅनिटायझर लावा असं बोंबलून चालणार नाही. फक्त लढ म्हणून चालणार नाही, खांद्याला खांदा लावून काम करायला हवं अशी अपेक्षा महाजन यांनी व्यक्त केली.
विशेष म्हणजे राज्यात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा फार मोठा आहे. परंतु राज्य सरकार त्यात लपवा छापवी करत असल्याची टीका करत टेस्टिंगबाबत मोठा गोंधळ असल्याचा खुलासा करण्यात आला आहे.
राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढले म्हणून अनेक अधिकाऱ्यांच्या इकडून तिकडे बदल्या करण्यातच सरकारने धन्यता मानली. पूर्वीपासूनच कोरोनासाठी कडक उपाययोजना केल्या असत्या तर आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती असे स्पष्टीकरण गिरीश महाजन यांनी केली आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: