नांदेड: नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथील शंकर नगर मधील इयत्ता सातवी मध्ये शिकत असणाऱ्या मातंग समाजाच्या अल्पवयीन विद्यार्थीनीवर शाळेतीलच शिक्षक व कर्मचाऱ्यांनी सामूहिक अत्याचार केला. तसेच याबाबत कोणाला सांगितल्यास विद्यार्थिनीला जिवे मारण्याची धमकी देऊन प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या नराधमांना तात्काळ फाशीची शिक्षा झाली पाहिजे. तसेच अकोला जिल्ह्यातील मरोळा येथील मातंग समाजाची अल्पवयीन विद्यार्थिनी मनीषाताई सरकटे हिच्यावर देखील गुंड प्रवृत्तीच्या नराधमांनी बलात्कार करून तिला फास देऊन जिवे मारणाऱ्या या नराधमांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी.
अलीकडील काळात महाराष्ट्रात मातंग समाजावर मोठ्या प्रमाणात अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. हे रोखण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात अन्यथा पुढील काळात समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचारा संबंधित राज्यभरातील मातंग समाज रस्त्यावर उतरून आपला आक्रोश विविध मार्गाने व्यक्त करून स्वतः स्वतः साठी न्याय मिळण्याच्या दिशेने प्रयत्नशील असेल. वरील प्रकरणातील नराधमांना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी माळेगाव बुद्रुक पोलीस ठाण्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे यांना लहुजी शक्ती सेनेच्या वतीने दि. २३/०१/२०२० रोजी निषेदाचे निवेदन देण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष कैलास सकट, बारामती तालुका अध्यक्ष संजय नेटके, रामचंद्र खरात, रमा भोंडवे, गणेश खरात, योगेश भोसले, राहुल खरात, प्रशांत सूर्यवंशी, प्रकाश आढागळे, अजित खंडाळे, योगेश खरात, दिलीप भिसे, सुरेश कांबळे, सुरज खंडाळे, ताई पवार,अर्चना मोरे, सुरेश सोनवणे, सागर कुचेकर मंगेश खरात कुणाल सकट, आदी समाज बांधव उपस्थित होते.