लखीमपुर सामूहिक बलात्कार: डोळे व जीभ कापली नाही- एसपी

उत्तर प्रदेश, १६ ऑगस्ट २०२०: उत्तर प्रदेशच्या लखीमपुर खेरी येथे पोलिस अधीक्षकांनी (एसपी) अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार आणि क्रूरतेच्या प्रकरणात स्पष्टीकरण दिले आहे. लखीमपूरचे एसपी सतेंद्र कुमार यांनी सामूहिक बलात्कार प्रकरणात पिडीतेचे डोळे फोडले आणि जीभ कापली याचा विरोध केला आहे. एसपी म्हणाले की मुलीचे डोळे काढल्याचे व जीप कापल्याचा कोणताही प्रकार घडलेला दिसला नाही.

पोस्टमार्टम अहवालात असे काहीही समोर आले नसल्याचे एसपी म्हणाले. उसाच्या शेतात हा मृतदेह सापडला आहे आणि डोळ्याच्या जवळच्या जखमेमुळे रक्त आलं आहे. गळा दाबल्यामुळे जीभ दाबली जाते. त्यामुळे जीभ कापली गेली नव्हती. पोस्टमार्टमच्या अहवालानुसार डोळे फोडले गेले किंवा जीप कापली गेल्याचे दोन्ही घटना चुकीच्या आहेत, हे स्पष्ट झालं आहे.

कुटुंबियांनी काय केला आहे आरोप

कुटुंबीयांचा असा आरोप आहे की, १३ वर्षीय पीडितेवर केवळ सामूहिक बलात्कारच नव्हे तर तिचे डोळे काढले गेले होते. तसेच तिची जीभ देखील कापली गेली होती. तिच्या गळ्यात पट्टा बांधून तिला फरफटत नेले गेले. पीडितेच्या कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार तिचा मृतदेह उसाच्या शेतात आढळला होता. पीडितेच्या वडिलांनी सांगितले की, जेव्हा ते घटनास्थळी पोहोचले होते तेव्हा आरोपी तिथेच उपस्थित होते. पण, जेव्हा आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा त्यांनी तिथून पळ काढला.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा