लखीमपुर हिंसा- मुख्य आरोपी आशिषचा जामीन अर्ज फेटाळला; मित्र अंकितला 3 दिवसांची पोलीस कोठडी

नवी दिल्ली, 14 ऑक्टोंबर 2021: लखीमपूर हिंसाचार प्रकरणात, केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा आशिषचा मित्र अंकित दास याला सीजेएम कोर्टाने 3 दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवले आहे.  काल सकाळी गुन्हे शाखेत पोहोचल्यानंतर अंकितने आत्मसमर्पण केले.  5 तासांच्या प्रदीर्घ चौकशीनंतर अंकितला सीजेएम कोर्टात नेण्यात आले.  यावेळी अंकित दासने सांगितलं की मी फॉर्च्युनर कारमध्ये होतो, पण मी निर्दोष आहे.
 त्याचबरोबर मुख्य आरोपी आशिष मिश्रा उर्फ ​​मोनूचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलाय.  आता त्याचे वकील अवधेश सिंह पुन्हा जिल्हा न्यायाधीशांकडं जामिनासाठी आज (गुरुवारी) अर्ज करणार आहेत.
 विशेष बाब म्हणजे अंकित हा काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अखिलेश दास यांचा भाचा आहे.  आणखी एक आरोपी लतीफनेही अंकितसह शरणागती पत्करली आहे.  बुधवारी सकाळी पोलिसांनी अंकितच्या लखनौ येथील निवासस्थानी नोटीस पेस्ट केली होती.  काही तासांनंतर त्याने आत्मसमर्पण केलं.  अंकित हा केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिषचा मित्र आहे.
 फॉर्च्युनर अंकित च्या मालकीची
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, थार जीपने शेतकऱ्यांना चिरडल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.  थार च्या मागं धावणारी फॉर्च्युनर अंकित ची होती.  ही गाडी अंकितच चालवत होता.  फॉर्च्युनरच्या मागं असलेली स्कॉर्पिओ, जी व्हिडिओमध्ये दिसत होती, ती लखीमपूरस्थित एका ठेकेदाराची आहे.  त्याचवेळी अंकितचे वकील विकास श्रीवास्तव यांनी सांगितलं की, एसआयटीने चौकशीसाठी नोटीस पाठवली आहे.  यावर अंकित गुन्हे शाखेत पोहोचला.  काळी फॉर्च्यूनर त्याचीच होती पण तो त्यात नव्हता.
अंकित दास आणि लतीफ यांच्या वतीने सीजेएमच्या न्यायालयात शरणागतीसाठी अर्ज करण्यात आला होता.  या न्यायालयाने तिकुनिया पोलिसांकडून अहवाल मागितला होता, परंतु अंकित पोलिसांच्या अहवालापूर्वीच गुन्हे शाखेसमोर शरण आला.  लखीमपूर हिंसाचार प्रकरणात आतापर्यंत 4 आरोपींना अटक करण्यात आलीय.  यात लवकुश, आशिष पांडे आणि केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्रा आणि ड्रायव्हर शेखर भारती यांचा समावेश आहे.
 न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा