शिर्डी, ७ जुलै २०२३ : साईबाबांना आपले गुरू मानणारे जगभरात करोडो भक्त आहेत. गुरुपौर्णिमेला अनेक लोक नियमितपणे साई दरबाराला भेट देतात आणि अनेक लोक ऑनलाइन दर्शन करून देणग्याही पाठवतात. संस्थानचे सीईओ पी.शिव शंकर यांनी सांगितले की, गुरुपौर्णिमा उत्सवात साईंच्या चरणी भाविकांनी भरघोस देणगी दिली असून ३ दिवसात ७ कोटींहून अधिक रक्कम जमा झाली आहे.
या उत्सवादरम्यान संस्थानच्या प्रसादालयात १ लाख ५५ हजार भाविकांनी, प्रसाद भोजनाचा लाभ घेतला असून जनसंपर्क कार्यालयातील सशुल्क दर्शन पासद्वारे संस्थानला, ६७ लाख ३३ हजार रुपये प्राप्त झाल्याचे शिवशंकर यांनी सांगितले. येथील गुरुपौर्णिमा उत्सव २ पासून ते ४ जुलैपर्यंत साजरा केला. यावेळी दानपेट्या उघडण्यात आल्या. आणि या ३ दिवसात संस्थेला ७ कोटी रुपयांची देणगी मिळाली.
यामध्ये २ कोटी ८५ लाख रोख, डोनेशन काउंटरवर २ कोटी १६ लाख, साई प्रसादालयातील अन्नदान २ लाख ८४ हजार, डेबिट-क्रेडिट कार्ड ५६ लाख ८३ हजार, ऑनलाइन देणगी ६४ लाख ५ हजार, चेक-डीडी दान ८० लाख ७४ हजार, मनी ऑर्डरमध्ये २ लाख ९ हजार, २५ लाख ८२ हजार ४७२ किमतीचे ३०० ग्रॅम सोने, २ लाख ६३ हजार किमतीच्या ४ हजार ६७९ ग्रॅम चांदीचा समावेश आहे. उत्सवादरम्यान दर्शन रांगेत उभ्या असलेल्या १ लाख ८८ हजार भाविकांना बुंदी प्रसादाच्या पाकिटांचे वाटप करण्यात आले.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड