लक्ष्मीने अर्थव्यवस्था वाचविली तर निर्मला काय करेल?

नवी दिल्ली: देशाची अर्थव्यवस्था कमकुवत झालेली असताना विरोधी पक्षनेते आधीपासूनच सरकारवर टीका करत आहेत. मंदावलेल्या अर्थव्यवस्थे बाबत सरकारला विरोधी पक्षांनी कोंडीत पकडली आहे. असे असताना भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी एक खळबळजनक विधान केले आहे त्यांचे असे म्हणणे आहे की भारतीय चलनावर लक्ष्मीचा फोटो छापल्यास भारताची अर्थव्यवस्था सुधारेल. या विधानावरून सुब्रमण्यम स्वामी यांच्यावर सगळीकडून टीका करण्यास सुरुवात झाली आहे.

… मग अर्थमंत्री काय करतील?                                                                                            कॉंग्रेसचे नेते आणि ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी सुब्रमण्यम स्वामी यांच्यावर एक ट्विट केले. त्यांनी ट्विट मध्ये असे लिहिले की, आम्हाला अशी अपेक्षा होती की ते अर्थव्यवस्था सुधारणे विषयी काहीतरी सूचना देतील किंवा काहीतरी आयडिया देतील, परंतु त्यांनी असे म्हटले आहे की चलना वरती माता लक्ष्मी यांचा फोटो छापल्यावर अर्थव्यवस्था सुधारेल. जर माता लक्ष्मी यांची प्रतिमा छापल्यावर अर्थव्यवस्था सुधारणार असेल तर देशांच्या अर्थमंत्र्यांचे कामच काय राहिले.

काय बोलले होते सुब्रमण्यम स्वामी

देशाची अर्थव्यवस्था कमकुवत झालेली असताना विरोधी पक्षनेते आधीपासूनच सरकारवर टीका करत आहेत. मंदावलेल्या अर्थव्यवस्थे बाबत सरकारला विरोधी पक्षांनी कोंडीत पकडली आहे. असे असताना भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी एक खळबळजनक विधान केले आहे त्यांचे असे म्हणणे आहे की भारतीय चलनावर लक्ष्मीचा फोटो छापल्यास भारताची अर्थव्यवस्था सुधारेल. या विधानावरून सुब्रमण्यम स्वामी यांच्यावर सगळीकडून टीका करण्यास सुरुवात झाली आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा