पटियाला, २७ जून २०२०: शनिवारी लडाखमध्ये कर्तव्य बजावत लान्स नाईक सलीम खान हे शहिद झाले . भारत-चीन सीमेवरील शोओक येथे शहीद झालेले २४ वर्षीय लान्स नायक हे मुळचे पटियाला मधील मर्दहेरी गावातील.
बंगाल अभियंता समूहाचे लान्स नाईक खान हे २५ जून रोजी लडाख सेक्टरमधील एलएसीजवळील शोओक नदीवर गस्त घालत असताना लढाईमध्ये जखमी होवून शहिद झाले.
यावेळी शहीद लान्स नायक सलीम खान यांना श्रध्दांजली वाहताना पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी शहीदाच्या कुटुंबातील एका व्यक्तिला सरकारी नौकरी व ५० लाख रू च्या मदतीची घोषणा केली आहे.
ते ट्वीट करत पुढे म्हणाले की “त्यांच्या कुटुंबीयांबद्दल मी शोक व्यक्त करतो व या शूर सैनिकाला सलाम करतो. जय हिंद!”
शहीद सलिम खान यांचे पार्थिव त्यांच्या गावी घेवून जाऊन पूर्ण सैन्य सन्मानाने त्यांना शेवटची सलामी देण्यात आली यावेळेस पंजाबचे कॅबिनेट मंत्री साधूसिंग धरमसोट यांनी आदरांजली वाहून राज्य सरकारचे प्रतिनिधीत्व केले.
शहीद सलिम खान यांच्या पश्चात आई-वडील, एक विवाहित बहीण आणि भाऊ असा परिवार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी