शेतजमिनीच्या वादावरून बेदम मारहाण

इंदापूर: शेतजमिनीच्या वादावरून मूळ जमीन मालकास व नातलगांना मारहाण करण्याचा प्रकार इंदापूर मधील पडस्थळ येथे समोर आला आहे. या आरोपावरून पडस्थळ भागातील राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते व इंदापूर कृषी बाजार उत्पन्न समिती चे माजी उपसभापती पांडुरंग मारकड यांच्यासह नऊ जणांविरुद्ध इंदापूर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे.

पांडुरंग ज्ञानदेव मारकड, तुळशीराम ज्ञानदेव मारकड, दादा एकनाथ मारकड, हनुमंत ज्ञानदेव मारकड, कैलास झिटे हे सर्व राहणार इंदापूर पडस्थळ येथील आहेत. त्याचबरोबर पांडुरंग मारकड यांचा थोरला भाचा, तुळशीराम मारकड यांचा मोठा मुलगा व या व्यतिरिक्त दोन अनोळखी व्यक्ती यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. संतोष आगीनाथ शिंदे यांनी सदर फिर्याद नोंदवली आहे.

याबाबतची सविस्तर घटना अशी की, फिर्यादी शिंदे आपल्या कुटुंबासह पडस्थळ येथे राहतात व शेती करतात. त्यांची गट नंबर २४/६ मधील सहा हेक्टर ४० आर शेत जमीन फिर्यादी यांचे वडील आगीनाथ शिंदे यांच्या नावे आहे. या शेत जमिनीपैकी चार एकर शेत जमीन फिर्यादीच्या वडिलांनी दहा ते बारा वर्षांपूर्वी पांडुरंग ज्ञानदेव मारकड यांना वाट्याने करण्यासाठी दिली होती. या शेतजमिनीत मारकड बंधूंनी उसाचे पीक घेतले आहे. वाटेने जमीन करायला दिल्यामुळे फिर्यादी व मारकड यांच्यामध्ये वाद सुरू आहेत व हे प्रकरण इंदापूर न्यायालयात दाखल झाले आहे.

मारकड बंधूंनी या शेतजमिनीत लावलेला उस फिर्यादी व त्यांच्या वडिलांच्या नावे ऊस कारखान्यात जमा करू असे सांगितले होते. ऊस तोडीचे काम सुरू असताना शेत जमिनीचे मूळ मालक शिंदे कुटुंबीय जमीन भागावर गेले असता मारकड बंधूंनी त्यांना विरोध दर्शवत तुमचा ह्या शेतीशी संबंध नाही असे बोलण्यास सुरुवात केली. शिंदे कुटुंबीयांनी या ऊसतोडीला विरोध केल्यावर मारकड बंधूंनी आपल्या साथीदारांना बोलवून घेतले. आपल्या साथीदारांसह मारकड बंधूंनी फिर्यादी शिंदे कुटुंबीयांना मारहाण केली. या मारहाणीमध्ये जखमी झालेल्या फिर्यादी व त्यांच्या वडिलांना इंदापूर मधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

फिर्यादी यांनी व्हाट्सअप च्या माध्यमाने लोकांना केलेली विनंती:

सर मी अनिल बाबुराव शिंदे मु,पोस्ट पडस्थल ,तालुका इंदापूर जिल्हा पुणें, समाज बांधवांनो आमच्या जमीनी चा वाद सुरू आहे गाव गुंडानी आमची जमीन हडपली आहे गेल्या वेळेस दोन ते तीन वेळेस पोलिस ठाण्यात तक्रार केली तरी त्यांच्या वर काहिच कारवाई करण्यात आली नाही। समाज बांधवांनो ह्यामुळे त्या गाव गुंडांची हिंमत येवडी वाढली आहे की त्यानी स्वता त्याच्या साथीदाराच्या साथीने प्राणघातक हल्ला केला त्यात माझे वडील काका काकांचा मुलगा जबरदस्त जखमी झाले आहेत ते तिघेही इंदापूर च्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। काकांची तबेत जास्त गंभीर आहे। पोलिस कारवाई काहीच करीत नाहीत ते गावगुंड रुग्णालयात येऊन पुन्हा धमकी देवून गेले की आता गावात आलात तर जीव घेऊन टाकू साहेब आम्ही फारच गरीब माणस आहोत आम्हची 16 एकर जमीन आहे ह्या गावगुंडाचा त्याच्यावर डोळा आहे समाज बांधवांनो तुम्हाला हाथ जोडून विनंती करतो आहे उद्या तुम्ही सकाळी इंदापूर ला ह्या तुमच्या डोळ्यांनी पाहा की पैशाने सुस्त झालेले लोक गरिबांवर कसें अन्याय करतायत ह्या अन्यायाला वाचा फोडा समाज बांधवांनो प्लिज उद्या सकाळी 10वाजेपर्यंत या गरीब शेतकरी तुम्हाला आवाज देतोय आज आमच्यावर वेळ आली आहे आज खऱ्या अर्थाने आपल्या मदतीची गरज प्लिज सहकार्य करा पैशाची भाषा करणाऱ्या मस्तवाल गुंडांना, आपल्या नाथपंथी डवरी गोसावी समाजाची काय ताकद आहे ही दाखवून देण्याची वेळ आली आहे। अन्याय आपल्या समाजाने किती वर्षे सहन करायचं अन्याया विरुद्ध आवाज उठवला पाहिजे आपण गप्प बसतो म्हणूनच अन्याय करणाऱ्या ची हिंमत वाढते एकत्र येऊन लढा देऊ हा संदेश share करा आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी या। मदत करा पत्रकारान पर्यन्त आवाज पोहचवा आपला समाज बांधव अनिल बाबुराव शिंदे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा