मुंबई, ३० सप्टेंबर २०२० : राज्यातल्या अनुसूचित जमाती आणि वननिवासी लोकांना घरं बांधण्यासाठी, आता त्यांच्या लगतच्या वनक्षेत्रात जमीन उपलब्ध करून दिली जाणार आहे. यादृष्टीनं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वनाधिकार अधिनियम २००६ मध्ये आवश्यक बदल केला आहे. या बदलामुळे अशा अनुसूचित क्षेत्रात पूर्वापार राहत आलेल्या नागरिकांचं त्यांच्या मूळ गावातून होणारं स्थलांतराचं प्रमाण कमी व्हायलाही मदत होईल. याबाबतची अधिसूनचनाही काल जारी करण्यात आली.
या अधिसूचनाचे प्रत राजभवनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिली आहे. राज्यपालांनी पालघर, नंदुरबार आणि गडचिरोलीसह इतर जिल्ह्यांना भेट दिली होती. या भेटींदरम्यान तिथल्या नागरिकांच्या स्थलांतराचा प्रश्न त्यांच्या निदर्शनास आला होता. संबंधितांशी चर्चा करून राज्यपालांनी वनाधिकार अधिनियम २००६मधे बदल करायचा निर्णय घेतला.
न्यूज अनकट प्रतिनिधी